---Advertisement---

जर आयपीएल झाली तर नेपाळसह या ८ देशांना होणार करोडोंचा फायदा, कारणही आहे खास

---Advertisement---

सूत्रांच्या माहितीनुसार आईपीएल स्पर्धा २६ सप्टेंबर ते ०८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाऊ शकते. ही आईपीएलच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आली आहे. परंतु, बीसीसीआयने अद्याप आयपीएल २०२० संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आयसीसीने औपचारिकता म्हणून २०२० टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता बीसीसीआय आयपीएल २०२० संबंधित अधिकृत माहिती जाहीर करु शकतात.

भारतात प्राणघातक कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतात आयपीएल आयोजित करणे कठिण वाटत आहे. त्यामुळे ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित केला जाईल अशी चर्चा आहे. यासाठी सर्व संघ मालकांनी त्यांची संमतीही दिली आहे.

युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे २ स्टेडियम एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. तसेच खेळाडूंना राहण्यासाठी मोठ्या संख्येने ५ स्टार हॉटेल आहेत. अशा परिस्थितीत येथे या स्पर्धेचे आयोजन सहज केले जाऊ शकते. एकीकडे आयपीएल २०२० च्या आयोजनामुळे चाहते खूष आहेत, तर दुसरीकडे बीसीसीआयच्या या निर्णयाने ९ देशांच्या खेळाडूंमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

कारण आयपीएल २०२० आयोजित करून या ९ देशांना अनेक कोटींचा फायदा होणार आहे. तर मग ते ९ देश कोणते आणि किती फायदा होऊ शकतो बघूया.

९. नेपाळ (रुपये २० लाख)

जगातील नामांकित स्पर्धांपैकी आयपीएल टी२० स्पर्धेत खेळाडूंच्या प्रतिभेनुसार देश-विदेशातील बर्‍याच खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. देश छोटा असो की मोठा, काही फरक पडत नाही. आयपीएलमध्ये येण्यासाठी फक्त खेळाडूची प्रतिभा आणि कौशल्ये आवश्यक असतात. मग त्या खेळाडूला करोडपती बनायला वेळ नाही लागत. असाच एक खेळाडू भारताचा शेजारी देश नेपाळचा देखील आहे. त्याला आयपीएलमधून मोठी संधी मिळाली आहे.

लेग स्पिनर गोलंदाज संदीप लामिछाने हा नेपाळचा युवा खेळाडू आहे. संदीप हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे जो नेपाळमधून आहे. आयपीएल २०१९ मध्ये संदीप दिल्ली कॅपिटलमधून खेळताना दिसला होता आणि यावेळीही तो या संघात असेल. नेपाळच्या या खेळाडूला आयपीएल २०२० च्या आयोजनामुळे २० लाख रुपयांचा फायदा होणार आहे.

कारण दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा संदीपला आयपीएल २०२० मध्ये २० लाख रुपये देऊन त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे.

८. श्रीलंका (रुपये २.५ करोड)

आयपीएल २०२० स्पर्धेचा सर्वाधिक फायदा करणारा श्रीलंका हा आठवा देश आहे. श्रीलंकेतील बरेच खेळाडू अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत. या श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये लसिथ मलिंगा आणि इसुरू उड़ाना सारखे वेगवान गोलंदाज खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंची आयपीएल रक्कम २ कोटी ७० लाख रुपये आहे.

लसिथ मलिंगाला मुंबई इंडियन्सने आणि इसुरू उड़ानाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल २०२० मध्ये एकूण २.७० लाख रुपये देऊन आपल्या संघात घेतले आहे.

७. न्यूझीलंड (रुपये ९.८ करोड)

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये इतर सर्व देशांप्रमाणेच न्यूझीलंडचेही बरेच खेळाडू खेळतात. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे सर्व दिग्गज खेळाडू आयपीएलचा एक भाग आहेत. त्यापैकी काही खेळाडूंवर संघ मालकांनी खूप पैसा खर्च केला आहे.

न्यूझीलंड संघाचा सध्याचा कर्णधार केन विल्यमसन आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्याचबरोबर, यंदाच्या आयपीएल २०२० च्या लिलावात जेम्स नीशमला ५० लाखामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी करून त्यांच्या संघात स्थान देण्यात दिले आहे. तसेच मिशेल सँटेनर चेन्नई सुपर किंग्स संघात आहे.

न्यूझीलंडचे सर्व खेळाडूंना मिळून आयपीएलमध्ये ९ कोटी ८० लाख रुपये मिळतात.  या कारणास्तव न्यूझीलंडचे नाव या यादीत ७ व्या स्थानावर आहे.

६. अफगाणिस्तान (रुपये १४ करोड)

या संघाने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामगिरीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. आयपीएल २०२० चा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला आहे, आयपीएलमध्ये या देशातील खेळाडूंनाही मोठा फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेत आहेत. या देशातील खेळाडूंना २०१७ मध्ये म्हणजे आयपीएल १० मध्ये प्रथमच प्रवेश मिळाला. त्यावेळी राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान या प्रतिभावान खेळाडूंचा या लीगमध्ये समावेश होता. त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर संघ मालकांनी या खेळाडूंवर एकूण १४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

५. दक्षिण आफ्रिका (रुपये ३४ करोड ६० लाख)

आयपीएलच्या पहिल्याच हंगामापासून आयपीएलमध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश होता. या हंगामातही दक्षिण आफ्रिकेचे अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलमधील वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत. यात एबी डिव्हिलियर्स, फाफ डू प्लेसिस, डेव्हिड मिलर आणि कॅगिसो रबाडा यांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मॅच विनिंग खेळाडू आहे. तसेच त्याला भारतीय चाहत्यांनीही खूप पसंती दिली आहे. एबी डिव्हिलियर्स व्यतिरिक्त ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी यांसारखी मोठी नावेही यात सहभागी आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंना एकूण ३४.६० कोटी मिळतात.

४. इंग्लंड -. (रुपये ४३.८० करोड)

आयपीएल २०२० च्या लिलावात संघ मालकांनी ओएन मॉर्गन आणि ख्रिस वॉक्स सारख्या बर्‍याच इंग्लंडच्या खेळाडूंवर पैसे लावून आपल्या संघात घेतलं आहे. आता आयपीएल २०२० मध्ये इंग्लिश संघातील दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.

आयपीएल २०२० मध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि जोफ्रा आर्चर यांच्यासह सर्व इंग्लिश खेळाडूंना मिळून एकूण ४३.८० कोटींची रक्कम मिळते.

३. वेस्ट इंडीज (रुपये ५६.९६ करोड)

जगातील सर्व टी-२० लीगमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंबद्दल बोललो तर पहिले नाव वेस्ट इंडिजचे असेल. या कॅरेबियन फलंदाजांचे षटकार जगभर प्रसिद्ध आहेत. तसे, संपूर्ण वेस्ट इंडीज क्रिकेट संघ टी२० क्रिकेटसाठी सध्या ओळखला जातो. म्हणून आयपीएलमध्ये प्रत्येक संघमालकानी या खेळाडूंवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.

आयपीएल २०२० मध्ये एकूण ५६.९६ कोटी रुपये देऊन सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो यासह सर्व कॅरेबियन खेळाडूंचा विविध संघात समावेश करण्यात आला आहे. या यादीत वेस्ट इंडीज तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२. ऑस्ट्रेलिया (रुपये ८६.७५ करोड)

जगातील सर्वात महागड्या आयपीएल टी-२० लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचे जवळपास सर्व मोठे खेळाडू खेळतात. आयपीएल लिलाव २०२० मध्ये पॅट कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल १५.७५ कोटीमध्ये खरेदी केले. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू आहे.

आयपीएलमध्ये खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये बरीच मोठी नावे आहेत. या खेळाडूंमधील अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांच्यावर खूप पैसे लावले आहेत.

पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह ऑस्ट्रेलियन सर्व खेळाडूंना मिळून एकूण रुपये ८६.७५ कोटी मिळतात. ऑस्ट्रेलिया या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

१. भारत (रुपये ३५८.१५ करोड)

या स्पर्धेत भारतीय खेळाडू सर्वात जास्त खेळतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही भारतीय लीग आहे आणि एका संघांतील अंतिम ११ मध्ये ४ परदेशी आणि ७ भारतीय खेळाडूंचा संघात समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आयपीएलचा सर्वाधिक फायदा होईल हे सत्य आहे.

कारण आयपीएल २०२० मध्ये रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, मनीष पांडे आणि केएल राहुल यांच्यासह सर्व भारतीय खेळाडूंना त्यांच्या एकूण ३५८.१५ कोटी रुपये देऊन विविध संघात स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे.

वाचनीय लेख –

वाचनीय लेख –

या ३ भारतीयांना वेळीच संधी मिळाली असती तर आज असते दिग्गज क्रिकेटपटू

एकट्याच्या जीवावर इंग्लंड नडणारा परंतू आता विस्मृतीत गेलेला वेणुगोपाल राव

क्रिकेटमधील सर्वात मस्तमौला खेळाडू, ज्यांनी भारताला दिला सौरव गांगुली नावाचा हिरा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---