आयपीएलचा मिनी लिलाव शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोचिन येथे पार पडला. या लिलावात काही खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, तर काही खेळाडू मात्र कोट्याधीश झाले. आयपीएल 2023च्या या लिलावात असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांना 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली आणि काही असे देखील खेळाडू आहेत ज्यांना एकेकाळी मोठ्या रक्कमेत खरेदी करण्यात आलेले. मात्र, या हंगामात त्यांना स्वस्तात दुसऱ्या संघात जावे लागले. यातही काही खेळाडू असे आहेत, ज्यांना मागच्या हंगामात 15 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली होती आणि या हंगामात त्यांना त्यांच्या बेस प्राईजवर खरेदी केले गेले. अशाच खेळाडूंबद्दल तुम्हीही जाणून घ्या.
1.काईल जेमिसन-
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसन (Kayle Jamieson) याला आयपीएल 2021च्या लिलावात त्याला आरसीबी संघाने 15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, यंदाच्या लिलावात त्याला त्याच्या 1 कोटीच्या बेस प्राईजवर खरेदी केले. त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने खरेदी केले.
2.केन विलियम्सन-
न्यूझीलंडचा हा दुसरा खेळाडू मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये खेळला होता. त्याला या संघाने 14 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते, पण यंदाच्या आयपीएल मिनी ऑक्शन मध्ये तो केवळ 2 कोटीच्या बेस प्राईजवर विकला गेला. त्याला गुजरात टायटन्स संघाने विकत घेतले.
3. झाय रिचर्डसन
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन (Jhye Richardson) 2021च्या आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघासाठी 14 कोटी रुपयांमध्ये खेळला होता. मात्र, यंदाच्या आयपीेएल हंगामात त्याला फक्त 1.5 कोटी रुपये मिळाले. झाय रिचर्डसन याला त्याच्या बेस प्राईजवर मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले.
4. ओडियन स्मिथ
या यादीत ओडियन स्मिथ (Odian Smith) याचेे देखील नाव आहे. स्मिथला आयपीेएल 2022च्या लिलावात पंजाब किंग्ज संघाने 6 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये त्याला त्याच्या बेस प्राईजवर फक्त 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्याला गुजरात टायटन्स संघाने बेस प्राईजवर खरेदी केले.
5.रोमारियो शेफर्ड
रोमारियो शेफर्ड (Romario Shepard) याची देखील अशीच परिस्थिती आहे. त्याला मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने 7.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, यंदाच्या आयपीएल लिलावात त्याला फक्त 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर लखनऊ सुपर जायंट्स संघाने खरेदी केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय! आयपीएलच्या संघांना न जमलेला विक्रम शेजारच्या देशात घडला, जाफना किंग्जने रचला इतिहास
तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के