इंडिनय प्रीमियर लीग 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (28 मे) आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. उभय संघांतील या सामन्याआधी अहमदाबादच्या नेरंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलची क्लोजिंग सेरेमनी आयोजित केली गेली आहे. सोबतच सामन्यादरम्यान मीड शो देखील होणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून अंतिम सामन्यात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली गेली.
रॅपर किंग, न्यूक्येया, डिवाईन आणि जोनिता गांधी यांना आयपीएलच्या अंतिम सामन्यात आपल्या आवाजाने धमाक करणार आहेत. डिवाईन आणि जोनिता मीड शो म्हणजेच पहिली इनिंग संपल्यानंतर परफॉर्म करणार आहेत. दरम्यान एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज आधीच अंतिम सामन्यात पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ शुरुवारी (26 मे) क्वॉलिफायर दोनमध्ये आमने सामने असतील. मुंबई आणि गुजरातमधील विजेता संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल.
आयपीएलच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शुक्रवारी दोन पोस्ट शेअर केल्या गेल्या, ज्यामध्ये चाहरी परफॉर्मर्सची नावे सांगितली गेली आहेत. आयपीएलने या पोस्टमध्ये लिहिले की, “अहमदाबाद – ट्रीटसाठी तयार रहा. एक अप्रतिम सायंकाळ आहे, ज्यासाठी तयार रहा. किंग आणि न्यूक्लेया धमाल करायला येत आहेत. तुम्ही या दोघांची ऍक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहात?” दुसऱ्या ट्वीटमध्ये आयपीएलने लिहिले की, “नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये अविस्मरणीय परफॉर्मेंस होणार आहेत. डिवाईन आणि जोनिता गांधी यांना ऐकण्यासाठी तयार रहा.”
दरम्यान, आयपीएल 2023च्या क्वॉलिफायर एकमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला पराभूत केले होते. सीएसके आयपीएल कारकिर्दीत आपला 10 वा अंतिम सामना खेळण्यासाठी तयार आहे. अंतिम सामन्यात चेन्नईसमोर क्वॉलिफायर दोन सामना जिंकणाऱ्या संघाचे आव्हान असेल. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर दोन सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळला जात आहे. (These artists will perform in the IPL closing ceremony)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुखापत झाली नसती ना…’, वर्ल्डकप फायनलमधील पराभवाविषयी बोलला शाहीन आफ्रिदी
‘मी तर म्हणेल त्याची संघात…’, टी20 विश्वचषकातील विराटच्या संघातील स्थानाविषयी स्पष्टच बोलले गावसकर