मुंबई । आयपीएल 2020 चा तिसरा सामना सोमवार, 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंना अनेक थरारक आणि मनोरंजक विक्रम करण्याची संधी असेल. या सामन्यादरम्यान होऊ शकणार्या विक्रमांवर टाकूया एक नजर.
1. आरसीबी आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात एकूण 15 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 8 सामने सनरायझर्स हैद्राबाद संघाने जिंकले आहेत. आरसीबी संघाने 6 सामने जिंकले आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादला आरसीबी विरुद्ध 9 वा सामना जिंकण्याची संधी असेल. त्याचबरोबर आरसीबीला हैद्राबादविरुद्ध 7 व्या विजयाची संधी असेल.
2. विराट कोहलीने या सामन्यात 88 धावा केल्या तर आयपीएलमध्ये 5500 धावा करणारा तो पहिला खेळाडू होईल.
3. विराट कोहलीने या सामन्यात 10 षटकार ठोकले तर गेल, डिव्हिलियर्स आणि धोनीनंतर तो आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा चौथा खेळाडू बनेल.
4. पार्थिव पटेल एक षटकार ठोकताच आयपीएलमध्ये आपले 50 षटकार पूर्ण करेल.
5. जर केन विल्यमसननेही या सामन्यात 6 षटकार ठोकले तर तो त्याचे आयपीएलचे 50 षटकार पूर्ण करेल.
6.युझवेंद्र चहलने आयपीएलमधील 2.1 षटके गोलंदाजी केली तर 300 षटके टाकलेल्या गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होईल.
7. जर विराट कोहलीने या सामन्यात 5 षटकार ठोकले तर तो सर्वात जास्त षटकार ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत आयपीएलमध्ये रैना आणि रोहितला (194 षटकार) मागे टाकेल. सध्या या यादीत विराट सहाव्या क्रमांकावर आहे.
8. विराट कोहलीने जर या सामन्यात शतक केले, तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या ख्रिस गेलची बरोबरी करेल. सध्या गेलच्या नावावर आयपीएलमधील 6 शतकांची नोंद आहे. तर विराटच्या नावावर ५ शतके आहेत.






