आयपीएल म्हणजे क्रिकेट जगतातील विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा होय. दरवर्षी एप्रिल – मे दरम्यान भरली जाणारी ही स्पर्धा यावर्षी कोरोना संकटामुळे स्थगित केली होती. आता शेवटी बीसीसीआयने आयपीएलचे हे १३ वे सत्र यूएईमध्ये आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. १९ सप्टेंबर पासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
आयपीएलची अधिकृत घोषणा होताच, लीग सुरू होण्याची वाट पाहणार्या सर्व संघातील खेळाडूंमध्ये उत्साह संचारला आहे. देशी-परदेशी सर्व खेळाडू आयपीएलबद्दल उत्सुक आहेत. पण, आयपीएलचे बरेच विदेशी खेळाडू काही कारणास्तव, या हंगामाच्या पहिल्या काही सामन्यांत सहभागी होऊ शकणार नाहीत.
अशाच, पाच मोठ्या विदेशी खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया
१) बेन स्टोक्स – राजस्थान रॉयल्स
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सशिवाय, इंग्लंड संघाची सध्या कल्पनाही करता येत नाही. गेल्या काही वर्षांत बेन स्टोक्सने इंग्लंड संघासाठी ज्याप्रकारे कामगिरी केली आहे त्याद्वारे, तो इंग्लंड संघाचा सर्वात अनमोल खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्येसुद्धा बेन स्टोक्सचा असाच प्रताप पाहायला मिळाला होता. २०१७ मध्ये प्रथमच आयपीएलमध्ये दाखल झाल्यानंतर, स्टोक्सने त्या हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. त्या मोसमात तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता.
राजस्थान रॉयल्सबरोबरचे दोन हंगाम मात्र तो विशेष काही करू शकला नाही. मात्र स्टोक्ससारख्या खेळाडू केव्हा ही सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता ठेवतो. २०२० आयपीएल हंगामात स्टोक्स उशिरा यूएईमध्ये पोहचेल. कारण, आयपीएलच्या पहिला आठवड्या दरम्यान इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका संपेल. त्यामुळे या दोन्ही देशाचे खेळाडू उशिराने दाखल होतील.
२) स्टीव्हन स्मिथ – राजस्थान रॉयल्स
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आज जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. स्मिथने आपल्या फलंदाजीच्या अनोख्या शैलीने ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. २०२० आयपीएलसाठी तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. गेल्या हंगामाच्या मध्यात स्मिथ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून निवडला गेला होता. त्याच्याकडे कर्णधारपदाचा दांडगा अनुभव आहे. परंतु, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे त्याला या आयपीएल मोसमातील पहिला एक आठवडा खेळता येणार नाही.
३) एबी डिव्हिलियर्स – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सचा टी२० मधील महान फलंदाजांत समावेश होतो. क्रिकेटविश्वात एबी डिव्हिलियर्स हे किती मोठे नाव आहे हे, कुणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. २०१८ च्या आयपीएलनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु तो जगभर लीग क्रिकेट खेळत असतो. आयपीएलमध्ये तो आरसीबीच्या संघाचा प्रमुख खेळाडू व उपकर्णधार आहे.
डिव्हिलियर्सला या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात युएईमध्ये पोहोचणे कठीण होईल. कारण, दक्षिण आफ्रिकेतील प्रवासी उड्डाणे कोरोनामुळे बंद आहेत. ती सप्टेंबरच्या अखेरीस उघडण्याची शक्यता असल्यामुळे द. आफ्रिकेचे खेळाडू वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मात्र खेळाडूंना ना – हरकत प्रमाणपत्रे देणार असल्याचे सांगितले आहे.
४) ग्लेन मॅक्सवेल – किंग्ज इलेव्हन पंजाब
टी२० क्रिकेटमुळे आतापर्यंत अनेक स्फोटक फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा या विध्वंसक फलंदाजांना समावेश होतो. ‘बिग शो’ नावाने प्रसिद्ध असलेला मॅक्सवेल गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलिया संघासोबतच आयपीएलमध्ये ही मॅक्सवेल महत्त्वाचा खेळाडू आहे आयपीएलच्या या हंगामात ग्लेन मॅक्सवेलला १०.७५ अशी तगडी किंमत देऊन किंग्ज इलेव्हन पंजाबने पुन्हा आपल्या संघात सामील केले आहे.
आयपीएल २०१९ मध्ये तो वैयक्तिक कारणांनी सहभागी झाला नव्हता. २०२० आयपीएल मध्ये मॅक्सवेलचा खेळ पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मॅक्सवेलचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश झाल्यास तो आयपीएलचे काही सामने खेळू शकणार नाही.
५) कगिसो रबाडा – दिल्ली राजधानी
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाल्यापासून कगिसो रबाडाने ज्या प्रकारची कामगिरी दाखविली आहे, त्याने हे सिद्ध होते की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली छाप नक्की पाडणार आहे. दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघाशिवाय आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये रबाडा दिल्ली कॅपिटल्स संघाचा चार वर्षापासून सदस्य आहे. आयपीएलच्या १३ व्या सत्राची घोषणा झाली आहे, पण, इतर दक्षिण आफ्रिकन खेळाडूंप्रमाणे तोदेखील, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सप्टेंबर अखेरपर्यंत बंद असल्या कारणाने पहिले काही आठवडे, आयपीएल खेळू शकणार नाही.
ट्रेंडिंग लेख –
४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
३ असे भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये खेळले हे अनेकांना माहितीही नसेल…
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी: या दिवशी होणार आयपीएलचा अंतिम सामना; १० डबल हेडर्सचा असणार समावेश
१२ वर्षांनंतर अनिल कुंबळेने ‘मंकीगेट’ प्रकरणाबाबत केला मोठा खुलासा
५०० विकेट्स पूर्ण करणारा ब्रॉड घरच्या मैदानावर आहे दादा; कारणेही आहेत तशीच