---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ पाच भारतीय खेळाडू ठरू शकतात विजयाचे शिल्पकार

---Advertisement---

भारतीय संघाला टी२० विश्वचषकातील त्याच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंडसोबत सामना करावा लागणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पाकिस्तानने या दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे पाणी पाजले होते. त्यानंतर पाकिस्तानने विश्वचषकातील पहिले तीनही सामने जिंकले आणि उपांत्य सामन्यातील त्यांचे स्थान जवळपास पक्के केले आहे. अशात भारताला जर उपांत्य सामन्यात जागा बनवायची असेल, तर त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे असणार आहे.

आयसीसी स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये यापूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला, तर भारताचे प्रदर्शन खूपच खराब दिसते. भारताने न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा शेवटचा विजय जवळपास १८ वर्षांपूर्वी २००३ मध्ये मिळवला होता. यानंतर भारताला एकदाही विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

रविवारी भारतीय संघांतील खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध चांगले प्रदर्शन करून दाखवावे लागणार आहे, ज्याच्या जोरावर संघ विजय मिळवू शकेल. आपण या लेखात भारताच्या पाच खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांनी या सामन्यात चांगले प्रदर्शन करणे गरजेचे असणार आहे.

रोहित शर्मा – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध चांगली खेळी करावी लागणार आहे. रोहित जर संघाला चांगली सुरुवात देऊ शकला तर, भारतीय संघ मोठी धावसंख्या करू शकतो. यापूर्वी जेव्हा जेव्हा रोहितने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, त्या सामन्यात शक्यतो भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शून्य धावांवर शाहीन अफ्रिदीच्या चेंडूवर बाद झाला होता. परिणामी भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, रोहित न्यूझीलंडविरुद्ध चांगले प्रदर्शन करेल आणि संघाला विजय मुळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सूर्यकुमार यादव – भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबावदारी सूर्यकुमार यादववरही असणार आहे. सूर्यकुमारला या महत्वाच्या सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असणार आहे. सूर्यकुमारला या सामन्यात चांगेल प्रदर्शन करून सिद्ध करावे लागणार आहे की, तो कोणत्याही परिस्थितीत चांगली खेळी करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमारने ज्याप्रकारची उत्कष्ट खेळी केली होती, त्याचप्रकारच्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही आहे.

विराट कोहली – भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त अर्धशतकी खेळी केली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच प्रकाररच्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. तसेच विराटला या सामन्यात विरोधी संघाला जास्त धावा करण्यापासून रोखण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. याव्यतिरिक्त तो गोलंदाजांकडून चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करून घेतो की, नाही हेदेखील पाहण्यासारखे असेल. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची आणि उपांत्य सामन्याच्या स्पर्धेत कायम ठेवण्याची विराटवर जबाबदारी असणार आहे.

हार्दिक पांड्या – भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोठी जबाबदारी असणार आहे. या सामन्यात हे पाहावे लागणार आहे की, हार्दिक गोलंदाजी करतो की नाही. हार्दिकने जर या सामन्यात गोलंदाजी केली, तर संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी कमी होईल आणि संघाला गोलंदाजीमध्ये अजून एक पर्याय मिळेल. हार्दिक त्याच्या मोठ्या मोठ्या शॉटसाठी ओळखला जातो आणि न्यूझीलंडविरुद्ध तो असेच प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

जसप्रीत बुमराह – न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराहावरही मोठी जबाबदारी असणार आहे. बुमराह या सामन्यात पॉवर प्लेमध्ये दोन आणि अंतिम टप्प्यात दोन षटके टाकू शकतो. जर वरुण चक्रवर्तीने पहिल्या टप्प्यात गोलंदाजी करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर बुमराह त्याचे चारही षटके अंतिम टप्प्यात टाकू शकतो. बुमराह जुन्या झालेल्या चेंडूसोबत अजूनच आक्रमक गोलंदाजी करतो. अशात त्याच्या जबरदस्त यॉर्करचा सामना करणे फलंदाजांसाठी जास्त कठीण होईल. बुमराहावर या सामन्यात जास्तीत जास्त विकेट्स घेण्याची जबाबदारी असणार आहे, ज्याच्या जोरावर भारतीय संघ विजय मिळवू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: पत्रकारांवर भडकला अफगाणिस्तानचा कर्णधार; म्हणाला, ‘क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारा’

“भुवनेश्वर एक अनुभवी गोलंदाज, पण मला त्याच्याऐवजी शार्दुलला निवडेल”

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---