महाराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनने बंद पडलेली महाराष्ट्रीय प्रीमियर लीग यावर्षी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (6 जून) यासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. तसेच एमपीएलच्या शिखर समितीने स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सहा संघांची नावेही निश्चित केली. मुळचा धाराशिवचा असणारा नोशाद शेख एमएल 2023मध्ये सर्धिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला. कोल्हापूर टस्कर्स संघाने त्याला 6 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. चला तर नजर टाकू एमएल 2023च्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर.
एमएल यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्स, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स या सहा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. लिलावात प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपयांची मर्यादा होती. तेवढ्या पैशात संघांना आपला 16 खेळाडूंचा संघ खरेदी करणे गरजेचे होते. पण तरीदेखील संघांनी काही मोजक्या खेळाडूंवर मनसोक्त पैसा खर्च केला.
नौशाद शेख 60 हजार रुपयांच्या बेस प्राइससह लिलिवात उतरला होता. पण कोल्हापूर टस्कर्स संघाने त्याच्या बेस प्राईसच्या 10 पट म्हणझे 6 लाख रुपये खर्च करून नौशादला खरेदी केले. दिव्यांग हिंगणेकर देखील 60 हजार बेस प्राईससह लिलावात उतरला होता. पण रत्नागिरी जेट्स संघाने त्याच्यावर 4 लाख 60 हजार रुपये खर्च केले. तिसऱ्या क्रमांकावर नाव आहे यश नाहर याचे. 60 हजार बेस प्राईस असलेला यश सोलापूर रॉयल्समध्ये सामील होण्यासाठी 3 लाख 80 हाजार रुपयांचा मालक बनला.
यादीत चौथा क्रमांक साहिल औताडे याचा आहे. 40 हजार बेस प्राईससह साहिल एमपीएलच्या लिलावात उतरला आणि कोल्सापूर संघाने त्याला खरेदी करण्यासाठी 3 लाख 80 हजार रुपये खर्च केले. सत्यजीत बछाव पाचव्या क्रमांकावर आहे. 60 हजार बेस प्राईसच्या सत्यजीतसाठी सोलापूर रॉयल्सने 3 लाख 60 हजार रुपये मोजले. (These five players were the most expensive in the MPL auction)
नौशाद शेख – 60 हजार बेस प्राईस
सोल्ड- 6 लाख 00 हजार (कोल्हापूर टस्कर्स)
दिव्यांग हिंगणेकर – 60 हजार बेस प्राईस
सोल्ड- 4 लाख 60 हजार (रत्नागिरी जेट्स)
यश नाहर – 60 हजार बेस प्राईस
सोल्ड- 3 लाख 80 हजार (सोलापूर रॅायल्स)
साहिल औताडे – 40 हजार बेस प्राईस
सोल्ड- 3 लाख 80 हजार (कोल्हापूर टस्कर्स)
सत्यजीत बछाव – 60 हजार बेस प्राईस
सोल्ड- 3 लाख 60 हजार (सोलापूर रॅायल्स)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
केएस भरतचा मोठा खुलासा, WTC फायनलसाठी धोनीकडून IPL मध्येच घेतल्या आहेत टिप्स