आयपीएल 2020 च्या ‘प्ले ऑफ’ मधील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 6 गडी राखून पराभव केला. हैदराबादचा संघ शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरोधात ‘क्वालिफायर 2’ चा सामना खेळणार आहे. या संघातील 4 खेळाडूंच्या कामगिरीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा हा भलताच खुश दिसतोय. त्याने या चारही खेळाडूंना सनरायझर्स हैदराबादचे ‘चार मिनार’ असल्याचे म्हटले आहे.
हैदराबाद हे शहर ‘चार मिनार’मुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आयपीएल 2020 च्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी शर्यतीत असलेल्या तीन संघांपैकी हैदराबाद हा देखील एक संघ आहे. या संघात सुरुवातीपासून चांगली कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंना आकाश चोप्राने संघाचे ‘चार मिनार’ असे म्हटले आहे. संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर, माजी कर्णधार केन विलियम्सन, अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर आणि फिरकीपटू राशिद खान अशी चार नावे त्याने निवडली आहेत.
डेविड वॉर्नर संघाचा कर्णधार असून त्याचा खेळदेखील जबरदस्त ठरत आहे. त्याने या हंगामात 15 सामन्यांत 546 धावा केल्या आहेत. केन विलियम्सनने देखील संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्याने 11 सामन्यांत 250 धावा केल्या आहेत. राशिद खानने देखील 15 सामने खेळत 19 बळी घेतले आहेत, तर उशिराने संघात जागा मिळालेल्या जेसन होल्डरने मात्र 6 सामन्यांत 55 धावा करत 13 बळी घेतले आहेत.
एका संघाला प्रत्येक सामन्यात 7 स्वदेशी व 4 विदेशी खेळाडू घेऊन खेळणे बंधनकारक आहे. आकाश चोप्राने निवडलेले चारही परदेशी खेळाडू हे हैदराबादसाठी संघात खेळत आहेत. दरम्यान एका सामन्यात खेळणाऱ्या चारही विदेशी खेळाडूंना चोप्राने हैदराबादचे ‘चार मिनार’ म्हणून संबोधले असून इतर 7 भारतीय खेळाडूंपैकी एकाचेही नाव यात समाविष्ट नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी
-नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
-“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख-
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
-बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार