भारत हा 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. आपल्या देशात युवकांची संख्या ही लक्षणिय आहे. या युवकांत असलेली प्रतिभा शोधणे आणि त्या प्रतिभेला योग्य मार्गावर आणणे अत्यंत आवश्यक आहे. या युवकांमध्ये असलेली क्रिकेटची प्रतिभा शोधणे आणि ती देशाच्या कामी आणणे यासाठीच डोमेस्टिक क्रिकेटच्या जोडीला आयपीएलचा जन्म झाला. आणि बघता बघता 2008 पासून आतापर्यंत आयपीएलने देशाला असे अनेक मोहरे दिले, जे आज भारतीय क्रिकेट संघाचा कणा बनले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामातही भारतीयांच्या नजरेत असे तीन हिरे दिसत आहेत, जे कदाचित लवकरच भारतीय संघात दिसू शकतात.
आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यात अनेक प्रतिभावंत खेळाडू समोर आलेत. परंतू यात सर्वांना चकित केले आहे ते मयंक यादव, अंगकृश रघुवंशी आणि शशांक सिंग यांनी. या तिघांमधील प्रतिभा आयपीएलमधून दिसून आलीये. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे हे भविष्य आहे, असे यांच्याबाबत बोलेल जात आहे.
मयंक यादव –
आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित करणाऱ्या मंयक यादवच्या वेगाची दखल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी घेतली आहे. मयंक यादव सध्या लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळत आहे. गेल्या वर्षी अर्थात 2023 मध्येही लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 20 लाख रुपयांमध्ये घेतले होते. परंतू त्याला यंदा 2024 मध्ये संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केल्याचे सर्वांनीच पाहिले.
शशांक सिंग –
आयपीएल 2024 च्या गुरुवारी (दि. 4) झालेल्या थरारक सामन्यात पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर शानदार विजय मिळवला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरातच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरसः हिरावून घेतला. पंजाबच्या या शानदार विजयात सिंहाचा वाटा उचलला तो शशांक सिंग याने शशांकने नाबाद 61 धावांची अर्धशतकी खेळी करत पंजाबला विजय प्राप्त करून दिला. शशांकच्या या खेळीने सर्वांनाच प्रभाविक केले आहे.
अंगकृश रघुवंशी –
अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक धावा करणारा अंगकृश रघुवंशी हाही सध्या सर्वांच्याच नजरेत भरला आहे. त्याला आयपीएल 2024 मध्ये ऑक्शनमध्ये KKR ने 20 लाख रुपयांमध्ये ताफ्यात घेतले. यंदाच दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातून त्याने पदार्पण केले. आणि पहिल्याच सामन्यात 27 चेंडूत 54 धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची फलंदाजी पाहून तो लवकरच भारतीय संघात दिसेल, असे बोलले जात आहे.
अधिक वाचा –
– मुंबई इंडियन्सच्या करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! संघाचा तारणहार पुन्हा परतणार, सुर्याच्या कमबॅकचा दिवस ठरला?
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ
– IPL 2024 GT vs PBKS : टॉस जिंकून पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात घातक खेळाडूंची एन्ट्री, पाहा प्लेइंग इलेव्हन