केन विलियम्सनच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघ येत्या १८ जूनपासून भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तत्पुर्वी त्यांना इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिकासुद्धा खेळायची आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन केले आहे.
बऱ्याचशा परदेशी संघांचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त असल्याकारणाने त्या संघातील खेळाडू आइपीएलमध्ये खेळतील की नाही? याबाबत अजूनही शंका आहे. त्यातही केन विलियम्सन उर्वरित आयपीएल सामन्यांमध्ये अनुपस्थित राहिला तर सनरायझर्स हैदराबाद संघाला पुन्हा नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागेल. अशात विलियम्सनची जागा घेण्यासाठी संघातील बरेचसे प्रतिभाशाली खेळाडू प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. या लेखात आपण केन विलियम्सनच्या अनुपस्थित कोण असू शकेल हैदराबादचा नवा कर्णधार? याबद्दल चर्चा करणार आहोत.
मनीष पांडे- नैनितालचा ३१ वर्षीय भारतीय फलंदाज मनीष पांडे याने आइपीएल कारकिर्दीती सुरुवात २००८ला केली होती. आतापर्यंत मनीषने एकूण १५१ आयपीएल सामने खेळले आहेत. ३०.३६ च्या सरासरीने मनीषने ३४६१ इतक्या धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने शतकसुद्धा झळकावले आहे. याव्यतिरिक्त त्याच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाल्यास हैदराबादसाठी तो एक उपयुक्त असा कर्णधार होऊ शकतो. मनीषचा हैदराबाद संघाचा अनुभव खूपच चांगला आहे. त्यामुळे केन विलियम्सनच्या अनुपस्थित मनीष हा चांगला विकल्प होऊ शकतो.
भुवनेश्वर कुमार- मेरठचा ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची आइपीएलची कारकीर्द २०११ला सुरु झाली होती. १० वर्षांच्या आइपीएल कारकिर्दीत भुवीने २४.६५ च्या सरासरीने १३९ बळी टिपले आहेत. तसेच भुवीने एका सामन्यात बळींचा पंच घेण्याचाही पराक्रम केला आहे. कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाल्यास भुवीकडे रणजी सामन्यांतील नेतृत्त्वाचा अनुभव आहे. अशामध्ये अनुभवी कर्णधार केन विलियम्सनच्या जागी अनुभवी खेळाडू भुवनेश्वरला हैदराबाद संघाची कर्णधारपदाची जवाबदारी मिळू शकते.
डेविड वार्नर- ३४ वर्षीय अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सलामी फलंदाज डेविड वार्नर २००९च्या आइपीएल मोसमापासून खेळत आहे. १२ वर्षांच्या आइपीएल कारकिर्दीत त्याने १४८ सामने खेळले. दरम्यान त्याने ४२.२२च्या सरासरीने ५४४७ धावा केल्या आहेत. सोबतच त्याने ४ शतके आणि ५० अर्धशतकेसुद्धा ठोकली आहेत.
कर्णधारपदाबद्दल बोलल्यास हैदराबाद संघाकडून सर्वात जास्त अनुभव असलेला खेळाडू म्हणजे डेविड वार्नर. वार्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबाद संघाला १ आइपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करता आली आहे. जर केन विलियम्सन आपल्या राष्ट्रीय संघाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यास कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा वार्नरच्या खांद्यावर येवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
बोल्टच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; गोलंदाज म्हणाला, ‘मला आयपीएल हंगामाचा गोड शेवट करायचा आहे’
चाहत्यांचं प्रेम पाहून परदेशी खेळाडू थक्क; म्हणाला, ‘भारतात क्रिकेट आणि धोनीची पूजा होते’
बांगलादेशला नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा शोध, तब्बल १००० विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची वर्णी?