---Advertisement---

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक…

On: बुधवार, मे 1, 2019 9:57 PM
---Advertisement---

बंगळूरु। मंगळवारी(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला 49 वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पण या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज श्रेयस गोपाळने हॅट्रिक घेत एक खास कारनामा केला.

पावसामुळे 5-5 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात गोपाळने बेंगलोरचे दिग्गज फलंदाज विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस यांची दुसऱ्या षटकात अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेत हॅट्रिक केली आहे.

पण बेंगलोरने विजयासाठी दिलेल्या 63 धावांच्या आव्हानाचा राजस्थान पाठलाग करत असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली.  त्यामुळे राजस्थानची धावसंख्या 3.2 षटकात 1 बाद 41 धावा अशी असताना अखेर पंचांनी हा सामना रद्द केला आणि दोन्ही संघाना एक- एक गुण दिला.

गोपाळ आयपीएलमध्ये यावर्षी हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनने हा पराक्रम केला आहे. तसेच गोपाळ हा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा एकूण 16 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक अमित मिश्राने घेतली आहे. त्याने तीन वेळा हा कारनामा केला आहे. तसेच युवराज सिंगने 2 वेळा हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही हॅट्रिक त्याने 2009 मध्ये घेतल्या आहेत. अन्य 14 गोलंदाजांनी प्रत्येकी एक वेळा हॅट्रिक घेतली आहे.

या खेळाडूंनी घेतली आहे आयपीएलमध्ये विकेट्सची हॅट्रिक –

2008 – लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, मखाया एनटिनी

2009 – युवराज सिंग(दोन वेळा), रोहित शर्मा

2010 – प्रविण कुमार

2011 – अमित मिश्रा

2012 – अजित चंडिला

2013 – सुनील नारायण, अमित मिश्रा

2014 – प्रविण तांबे, शेन वॉटसन

2016 – अक्षर पटेल

2017 – सॅम्यूएल बद्री, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट

2019 – सॅम करन, श्रेयस गोपाळ

महत्त्वाच्या बातम्या –

सोशल मीडियावर अशी भावूक पोस्ट करत स्टिव्ह स्मिथने केले आयपीएल २०१९ला गुडबाय…

आयपीएल २०१९मध्ये हॅट्रिक घेणारा श्रेयस गोपाळ ठरला दुसरा गोलंदाज, पहा व्हिडिओ

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह, प्रशिक्षक फ्लेंमिंगने दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment