ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 साठी सोमवारी (12 सप्टेंबर) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात दोन खेळाडू असे आहेत, जे 15 वर्षांपूर्वी झालेल्या टी20 विश्वचषकातही भारतीय संघाचा भाग होते. हे दोन खेळाडू आणखी कोण नसून, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक हे आहेत. हे दोघे एकमेव अशी जोडी आहेत, जे 2007 नंतर पुन्हा एकदा भारताकडून एकत्र खेळताना दिसतील.
2007 साली (T20 World Cup 2007) पहिल्यांदा टी20 विश्वचषक खेळला गेला होता. या विश्वचषकातून रोहितने (Rohit Sharma) टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर कार्तिक (Dinesh Karthik) त्याआधीपासूनच टी20 क्रिकेटमध्ये खेळत होता. त्याने 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 कारकिर्दीची सुरुवात केली होती. 2007 नंतर 2010 सालच्या टी20 विश्वचषकातही रोहित आणि कार्तिकची जोडी एकत्र खेळली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये पुन्हा एकदा हे दोघे टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसतील.
2007च्या टी20 विश्वचषकात कार्तिक आणि रोहितबरोबर तत्कालिन कर्णधार एमएस धोनी, युवराज सिंग, अजित आगरकर, पियुष चावला, गौतम गंभीर, हरभजन सिंग, जोगिंदर शर्मा, युसूफ पठाण, इरफान पठाण, विरेंद्र सेहवाग, आरपी सिंग, एस श्रीसंत आणि रॉबिन उथप्पा हे होते. हे सर्व क्रिकेटपटू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
दिनेश कार्तिक धोनीनंतर आता रोहितच्या नेतृत्त्वात खेळणार
तसेच कार्तिक असा खेळाडू आहे, जो 2007 सालच्या धोनीच्या नेतृत्त्वाखालील टी20 विश्वचषक 2007च्या संघाचा भाग होता. आणि आता रोहितच्या कर्णधारपदाखाली 2022 चा टी20 विश्वचषकही खेळणार आहे.
🚨 NEWS: India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2022.
Rohit Sharma (C), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (WK), Dinesh Karthik (WK), Hardik Pandya, R. Ashwin, Y Chahal, Axar Patel, Jasprit Bumrah, B Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh
— BCCI (@BCCI) September 12, 2022
टी२० विश्वचषकासाठी अशी आहे १५ सदस्यीय भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि आर अश्विन.
स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.
‘पांडे’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर झाल्यानंतर केली घोषणा
महत्त्वाची बातमी: वर्ल्डकप तोंडावर असतानाच दक्षिण आफ्रिका संघात घडली मोठी घडामोड; वाचा सविस्तर
नाद केला! गेल्यावर्षी ढसाढसा रडलेल्या चहलने यावर्षी वर्ल्डकपसाठी टीम इंडियात जागा मिळवलीच