---Advertisement---

भारतासह ‘हे’ 4 संघ गाठू शकतात टी20 विश्वचषकाची सेमीफायनल, दिग्गजाला आहे विश्वास

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 1:10 PM
Team India vs ZIM
---Advertisement---

आगामी टी20 विश्वचषक 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होणार आहे. ही आयसीसी स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे. 23 नोव्हेंबरला विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. तत्पूर्वी सर्व सहभागी क्रिकेट संघांनी विश्वचषकासाठी त्यांचे 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत. क्रिकेट पंडित या संघांचे विश्लेषण करण्याबरोबरच वेगवेगळी भाकित करतानाही दिसत आहेत. दरम्यान इंग्लंडचे माजी क्रिकेटर टीम ब्रेसनन यांनी आगामी विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी केली आहे. त्यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या संघांची नावे सांगितली आहेत.

टी20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघ (Team India) आशिया चषक 2022 मध्ये खेळला होता. परंतु त्यांना या स्पर्धेत विशेष प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी आशिया चषकाची सुरुवात चांगली केली, परंतु त्यांना चांगला शेवट करण्यात अपयश आले. भारतीय संघाने आशिया चषकातील साखळी फेरीतील दोन्हीही सामन्यांत विजयी पताका झळकावली. मात्र त्यानंतर त्यांनी सुपर-4 फेरीतील पहिले सलग 2 सामने गमावले. त्यामुळे त्यांचा आशिया चषकातील प्रवास संपुष्टात आला होता.

यानंतर आता भारतीय संघ टी20 विश्वचषकात पुन्हा एकदा आपला दम दाखवताना दिसणार आहे. भारतीय संघाने 2007 साली शेवटचा टी20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 15 वर्षे लोटली, परंतु भारतीय संघ दुसऱ्यांदा विजेता बनू शकलेला नाही. बऱ्याचशा क्रिकेट दिग्गजांनी आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला विजेतेपदाचा दावेदार म्हटले आहे. मात्र ब्रेसनन (Tim Bresnan) यांनी उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या संघांची नावे सांगितली आहेत.

ब्रेसनन म्हणाले की, “टी20 विश्वचषकात भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ अंतिम 4 संघात पोहोचू शकतात. तुम्ही भारतीय संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. मला वाटते की, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ विजेतेपद जिंकण्याचे खरे दावेदार असतील. भारत आणि पाकिस्तान संघाकडेही विश्वविजेता बनण्याची चांगली संधी आहे. श्रीलंकेने आशिया चषकात वास्तवात चांगले प्रदर्शन केले होते. अशात अंदाज लावणे कठीण आहे की, कोणत्या दिवशी कोण कसे प्रदर्शन करेल.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

रोहित शर्माच नाही तर ‘हा’ खेळाडूही खेळणार आठवा टी20 विश्वचषक, कॅप्टन आहे संघाचा
चालू सामन्यात बदलता येणार प्लेइंग XI, आयपीएलसाठी आणलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर नियम’ नेमका काय?
पुन्हा दिसले युसूफचे रौद्ररूप, झंझावाती अर्धशतकासह इंडियाला 6 विकेट्सने जिंकून दिला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---