पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. आता तो एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने तीन माजी दिग्गज क्रिकेटपटूंबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, हे तिन खेळाडू माझे आवडते आहेत आणि त्यांच्यासारखा खेळाडू पुन्हा कधीच होणार नाही. शोएब अख्तरने या तीन माजी क्रिकेटपटूंचे खूप कौतुक केले आहे.
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आपल्या तीन अवडत्या खेळाडूंची नावे सांगितली आहेत. तो म्हणाला, “जगात तीन मोठे क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्यापेक्षा मोठा कोणीही असू शकत नाही. तिन्ही खेळाडू माझे आवडते आहेत आणि मी त्यांच्यासोबत खेळलो आहे. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) आहे. फिरकी आक्रमणात त्याच्यापेक्षा मोठा क्रिकेटपटू नव्हता. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर माझ्या मते वसीम अक्रम (Wasim Akram) याच्यापेक्षा मोठा कोणी नाही. परंतु मला वकार युनूस (Waqar Younis) जास्त आवडतो कारण मी त्याच्यामुळेच क्रिकेट खेळू लागलो, पण कौशल्याच्या बाबतीत वसीम अक्रम हा २०० वर्षांतील सर्वोत्तम आहे.”
अख्तर पुढे म्हणाला, “यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) फलंदाजीत माझा आवडता आहे. लोक म्हणतात की, तुम्ही विव रिचर्ड्सला इतके रेट का करत नाही, मग मी त्यांना सांगतो की त्यांच्या काळात पाकिस्तानचे मोठे गोलंदाज खेळले नाहीत आणि त्यांनी त्यांचा सामना केला नाही पण सचिन तेंडुलकरने वसीम अक्रमपासून इतरांपर्यंत अनेक बड्या गोलंदाजांना खेळले आहे.”
शोएब अख्तरबद्दल बोलायचे झाले तर तो प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडतो. तो अनेकदा भारतीय क्रिकेटबद्दलही बोलत असतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर त्याने विराट कोहली (Virat Kohli) याचे भरभरून कौतुक केले आणि यादरम्यान त्याने कोहलीला शतक पूर्ण करता न आल्याचाही उल्लेख केला. शोएब अख्तरच्या मते कोहली येत्या काही दिवसांत सचिन तेंडुलकरचा विक्रम नक्कीच मोडेल. (According Shoaib Akhtar there cannot be another player like these three players in the world)
महत्वाच्या बातम्या –
बाबरच्या संघर्षानंतर इफ्तिखारची फटकेबाजी, अफगाणिस्तानसमोर 283 धावांचे आव्हान
नूर अहमदचा ड्रीम वर्ल्डकप डेब्यू! बाबरसह पाडले पाकिस्तानचे तीन खंदे फलंदाज