भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले की, माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात त्याला पूर्ण पाठिंबा दिला. त्याचा परिणाम असा झाला की रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक जिंकला.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जूनमध्ये टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी टी20 विश्वचषक जिंकला होता. 2007 नंतर भारताचे हे दुसरे टी-20 विश्वविजेतेपद होते. रोहितने बार्बाडोसमधील त्या विजयासह या फाॅरमॅटला अलविदा केला.
“या संघात परिवर्तन घडवून आणणे आणि आकडेवारी, निकालांची फारशी चिंता न करणे हे माझे स्वप्न होते. जेणेकरून आम्ही असे वातावरण तयार करू की जिथे खेळाडू मैदानात जाऊ शकतील आणि जास्त विचार न करता मुक्तपणे खेळू शकतील. तसेच याची गरज होती. जय शाह, राहुल द्रविड (आणि) निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर या माझ्या तीन स्तंभांकडून मला खूप मदत मिळाली.
रोहित म्हणाला, ‘मी जे केले ते माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. त्यासोबतच निश्चितपणे वेगवेगळ्या वेळी आलेल्या अव्हांनांना समोरे गेलेल्या खेळाडूंना विसरता कामा नये. आम्ही विश्वचषक जिंकणे ही अशी गोष्ट होती जी शब्दात व्यक्त करता येणार नाही.’
तो म्हणाला, ‘हा क्षण रोज येऊ शकणारा नव्हता. त्यामुळे जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो, तेव्हा त्या क्षणाचा आनंद घेणे आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचे होते, जे आम्ही खूप चांगले केले. तसेच विजय परेड आमच्यासोबत साजरा केल्याबद्दल देशाचे आभार. भारतीय कर्णधार म्हणाला, ‘हे आमच्यासाठी जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच संपूर्ण देशासाठीही महत्त्वाचे होते. ट्राॅफी घरी परत आणून इथे सगळ्यांसोबत सेलिब्रेट करताना खूप छान वाटलं.
हेही वाचा-
हात-पाय तोडून मग…, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर युझवेंद्र चहलची तिखट प्रतिक्रिया
बार्बाडोसनंतर टीम इंडिया पाकिस्तानात तिरंगा फडकावणार? जय शहांनी केली मोठी भविष्यवाणी
अफगाणिस्तानला चॅम्पियन बनवणारा भारतीय ‘गुरू’ सापडला, टीम इंडिया सोबतही 7 वर्षांचा प्रवास