चेन्नई सुपर किंग्सने त्यांची आयपीएल २०२१ मोहीम एकाहून एक सरस विजयांसह सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील सात पैकी पाच सामने जिंकल्यानंतर सीएसके आणखी काही विजयांसह प्लेऑफमध्ये जाण्याची आशा आहे. सीएसकेसाठी आयपीएलचा १३ वा हंगाम खूप वाईट राहिली होता, जेथे ते प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नव्हते. पण यावेळी सीएसके संघात काही सकारात्मक बदल झाल्याचे दिसले. त्यामुळे यावेळी संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार दिसत आहे.
तत्पूर्वी आम्ही पहिल्या टप्प्यातील खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या आधारावर उर्वरित हंगामातही चांगली कामगिरी करत हे खेळाडू सीएसकेला त्यांचे चौथे विजेतेपद जिंकण्यास मदत करु शकतात. त्याच तीन प्रमुख खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
१. रवींद्र जडेजा
अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अलीकडच्या काळातील त्याच्या असाधारण कामगिरीचा विचार करता तो क्वचितच क्षेत्रात कमजोर दिसला आहे. फिटनेस असो फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण, प्रत्येक विभागात जडेजा मजबूत दिसला आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात जडेजाने १३१ धावा केल्या आहेत. त्याने १६१.७२ च्या स्ट्राईक रेटने त्याच्या धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने ६.७० च्या इकॉनॉमिकसह ६ विकेट्स घेतल्या. या अर्थाने त्याची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून त्याची फलंदाजी वेगळ्या पातळीवरची दिसली आहे. मात्र, तो चेंडूनेही चांगली कामगिरी करत आहे. खरे तर, असंही म्हणता येईल की टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या गोलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. हे सर्व पाहता, यात शंका नाही की जडेजा सीएसकेसाठी सर्वात मौल्यवान खेळाडू ठरू शकेल, जो त्यांना त्यांच्या चौथ्या विजेतेपदाकडे नेईल.
२. सॅम कुरन
सॅम कुरन हा त्या खेळाडूंपैकी एक आहे, जो संघातील महत्त्वाच्या वेळी त्याच्या क्षमतेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. प्रत्येक यशस्वी संघामध्ये असे खेळाडू असतात जे कोणत्याही क्षणी संघाचा डाव बदलू शकतात आणि कुरन चॅम्पियन अष्टपैलू आहे ज्याच्याकडे असे करण्याची क्षमता आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. ७ सामन्यांत त्याने १६ च्या स्ट्राईक रेटने ९ विकेट्स घेतल्या. त्याने फलंदाजीनेही प्रभावी कामगिरी केली आहे. सीएसके संघाच्या प्रदीर्घ फलंदाजीचा विचार करता, कुरनला अद्याप सर्वोत्तम संधी मिळालेली नाही. परंतू, जेव्हाही तो क्रीजवर आला तेव्हा तो प्रभावी ठरला.
त्याने फलंदाजीने केवळ ५२ धावा केल्या असल्या तरीही त्याने २०८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत सीएसकेला आशा आहे की, कुरन त्यांना चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावेल.
३. मोईन अली
मोईन अली हा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक आहे. तो टी२० क्रिकेटच्या या स्वरुपात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात चमकला आहे. आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये त्याने ३४.३३ च्या सरासरीने आणि १५८ च्या स्ट्राईक रेटने २०६ धावा केल्या आहेत. त्याने ६.१६ ची इकॉनॉमिक आणि १४ च्या स्ट्राईक रेटसह ५ विकेट्स घेतल्या आहेत. यूएईच्या खेळपट्ट्यांवर अली सीएसकेसाठी मॅच-विनर ठरताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाने एमएस धोनीला दिली ‘खास’ भेट; सीएसकेने शेअर केलेला फोटो व्हायरल
ओव्हल कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, कर्णधार कोहलीचे संकेत
“आमच्यावरील दबाव वाढला होता”, दारुण पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीची कबुली