महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचा 14 वा सामना गुरुवारी (7 मार्च) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात पार पडला. मुंबई संघाने यूपीवर 42 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला. मुंबई आणि यूपीचा हा हंगामातील प्रत्येकी सहावा सामना होता. मुंबईने चालू हंगामातील चौथा विजय मिळवला आणि गुणतालिकेत देखील झेप घेतली.
गुरुवारी मिळालेल्या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघाकडे 8 गुण झाले आहेत. गुणतालिकेत मुंबईसह दिल्ली कॅपिटल्स संघाकडेही 8 गुण आहेत. पण नेट रन रेटच्या आधारे मुंबईला दुसरा, तर दिल्लीला पहिला क्रमांक मिळाला आहे. या दोन संघांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के झाले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत इतर दोन संघांपेक्षा पुढे आहे. मुंबई आणि यूपीनंतर आरसीबी एकमेव संघ आहे, जो अजून एक पराभव मिळाला, तरीदेखील 8 गुणांपर्यंत मजल मारेल. आबसीबीने 6 पैकी 3 सामने जिंकले असून सध्या त्यांच्याकडे 6 गुण आहेत.
गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स संघ अडचणीत आहेत. कारण त्यांनी प्रत्येकी 4-4 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. या दोन्ही संघांकडे जास्तित जास्त 8 गुण मिळवण्याची संधी आहे. पण त्यासाठी पुढचे दोन्ही सामने मुंबई आणि गुजरातने जिंकणे गरजेचे आहे. दुसरीकडे पहिल्या तीन क्रमांकावर असणारे दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर संघ 10 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवू शकतात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरिअर्स सामन्याविषयी –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सच्या नुकसानावर 160 धावा केल्या होत्या. यात एकही खेळाडू अर्धशतक करू शकली नाही. नेट सायवह ब्रंड 45, तर एमिलिया केर हिने 39 धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या यूपीला मात्र 9 विकेट्सच्या नुकसानावर 119 धावांपर्यंतच मजल मारता आली. दीप्ती शर्मा हिने 53 धावांची नाबाद खेळी केली. पण दुसऱ्या बाजून दीप्तीला साथ देईल, अशी एकही खेळाडू खेळपट्टीवर टिकली नाही.
(These three teams are leading the race for the WPL 2024 playoffs)
महत्वाच्या बातम्या –
महिला क्रिकेटची सुपरस्टार हरमनप्रीत कौरचा आज वाढदिवस, विराट-धोनी नाही तर ‘या’ खेळाडूला मानते आदर्श
महेंद्रसिंग धोनीच आयपीएल 2024 मध्ये असणार चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार, अशी असू शकते CSK ची संभाव्य प्लेइंग 11