---Advertisement---

भारतीय वनडे संघाला लवकरच ‘हे’ तीन दिग्गज ठोकू शकतात रामराम

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू येतात आणि आपले कौशल्य दाखवतात. काही वेळा अस होते की, हे खेळाडू संघात खुप काळ टिकतात, तर काही खेळाडू संघातून लवकरच बाहेर पडतात. ही गोष्ट वनडे आणि टी-20 क्रिकेटसाठी अधिक प्रमाणात लागू होते.

भारतीय संघात खेळाडूंची कमी नाही परंतु, संघात जागा मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. टी-20 क्रिकेटमध्ये तर ही परिस्थिती खूपच कठीण असते. या संघात खेळण्यासाठी खेळाडूंमध्ये खूप चुरस बघायला मिळते. कारण या संघात स्थान मिळविण्यासाठी खुप खेळाडू धडधपडत असतात.

भारतीय संघात आल्यानंतर काही खेळाडू असे आहेत, जे खुप कालावधीसाठी संघातून बाहेर राहिलेत आणि शेवटी त्यांनी निवृत्ती घेतली. आता वनडे संघात ही अशी नावे आहेत, जे दिग्गज असूनही बराच काळ संघातून बाहेर राहिलेत. त्यामुळे असे वाटते की खेळाडू हे लवकरच वनडे संघातून निवृत्ती घेवू शकतात. त्यामुळे या लेखातून आपण अशा 3 खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत.

हे तीन खेळाडू वनडे संघातून लवकरच निवृत्ती स्विकार शकतात.

1.चेतेश्वर पुजारा

कसोटी संघात जबरदस्त सुरुवात करणारा चेतेश्वर पुजारा वनडे क्रिकेटमध्ये जास्त सामने खेळला नाही. सन 2013 मध्ये त्याने झिम्बाब्वे संघाविरुद्ध पदार्पण करताना पहिला वनडे सामना खेळला होता, तेव्हापासून आतापर्यंत तो फक्त 5 सामने खेळू शकला आहे. तो शेवटचा वनडे सामना 2014 साली बांगलादेश विरुद्ध ढाका मध्ये खेळला होता. त्याला आयपीएलमध्ये ही सहभागी करून घेतले जात नाही. या सर्व गोष्टी पाहून वाटातयं की पुजारा लवकरच निवृत्ती वनडेतून लवकरच निवृत्ती घेवू शकतो.

2.अजिंक्य रहाणे

कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असणारा अजिंक्य रहाणे हा वनडे संघात आपले स्थान पक्के करू शकला नाही. 2011 साली इंग्लंड विरुद्ध त्याने पदार्पण केले होते. अजिंक्यने 90 वनडे सामन्यात खेळताना 35 च्या सरासरीने 2962 धावा करण्यात यशस्वी ठरला आहे.

2018 साली आपला शेवटचा वनडे सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. अजिंक्यला आता वनडे संघात स्थान मिळण्याची शक्यता खुप कमी आहे. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी, तो वनडे संघातून लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतो.

3. ईशांत शर्मा

वनडे क्रिकेटमध्ये ईशांत शर्माने 2007 साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 80 वनडे सामने खेळलेत. परंतु, तो 2016 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. ईशांत कसोटी संघाचा प्रमुख खेळाडू आहे.  अशात तो कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष देण्यासाठी, वनडे संघातून निवृत्ती घेवू शकतो. वनडेत ईशांत शर्माने 115 बळी घेतलेत. त्यामुळे पुन्हा त्याला वनडे संघात जागा मिळण्याची शक्यता धूसर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“ही तर आयपीएल कराराची परतफेड”, ऑस्ट्रेलियन खेळाडूने सोडलेल्या कॅचवर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

हेच ते ‘विराट’पर्व! रन-मशीनच्या २२ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण, सचिनलाही टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---