जर असा प्रश्न विचारण्यात आला, की भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव काय, तर काही नावे लगेच सर्वांच्या मुखात येतील. परंतु जर या सर्वांमध्येही सर्वात चर्चेत असणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव निवडायला सांगितले, तर निश्चितच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांपैकी एक नाव निवडणे कठीण होईल.
आजकाल सोशल मीडिया हे खेळाडू किती लोकप्रिय आहेत, हे मोजण्याचे एक साधन झाले आहे. अनेक खेळाडू सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असतात. तसेच चाहतेही त्यांना फॉलो करत असतात.
अशाच ५ क्रिकेटपटूंबद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत, जे सोशल मीडियावर सर्वात प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे.
विराट कोहलीचा चाहतावर्ग आहे सर्वाधिक
क्रिकेटच्या आकडेवारी जरी भारतीय संघाचा कर्णधार विराट (Virat Kohli) सचिनपेक्षा मागे असला, तरी त्याने सोशल मीडियावर सचिनला खूप मागे सोडले आहे. विराट एकमेव असा क्रिकेटपटू आहे, ज्याचे सोशल मीडियाच्या ३ अव्वल प्लॅटफॉर्म म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर १० कोटींपेक्षाही अधिक चाहते आहेत. विराटला सोशल मीडियावर १३.८५ कोटी लोक फॉलो करतात, ज्यामध्ये एकट्या इंस्टाग्रामवर त्याचे ६.५३ कोटी चाहते आहेत. याव्यतिरिक्त त्याचे फेसबुकवर ३.७ कोटी आणि ट्विटरवर ३.६२ कोटी चाहते आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर
सोशल मीडियावरील चाहत्यांच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिनचा (Sachin Tendulkar) दुसरा क्रमांक आहे. त्याचे एकूण ८.४६ कोटी चाहते आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे २.३७ कोटी चाहत्यांबरोबर तो विराटच्या तुलनेत खूप मागे आहे. तसेच फेसबुकवर त्याचे २.८ कोटी चाहते, तर ट्विटरवर तो ३.२९ कोटी चाहत्यांबरोबर विराटच्या जवळ आहे.
तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे एमएस धोनी
भारतीय संघाचा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेला एमएस धोनी (MS Dhoni) सोशल मीडियावरील चाहत्यांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सोशल मीडियावर अतिशय कमी पोस्ट करणाऱ्या धोनीचे एकूण ५.२१ कोटी चाहते आहेत. त्यामध्ये इंस्टाग्रामवर २.४५ कोटी, फेसबुकवर २ कोटी आणि ट्विटरवर ७६ लाख फॉलोवर्स आहेत.
रोहित शर्माच्याही चाहत्या वर्गात होतेय प्रगती
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) क्रिकेटच्या विक्रमांप्रमाणेच सोशल मीडिया अकाऊंट्सवरील आकडेही वेगाने बदलत आहेत. रोहितचे एकूण ४.०८ कोटी चाहते आहेत. यामध्ये इंस्टाग्रामवर त्याचे १.४२ कोटी, फेसबुकवर १ कोटी आणि ट्विटरवर १.६६ कोटी चाहते आहेत.
विरेंद्र सेहवागचाही आहे आपला वेगळाच अंदाज
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) ज्याप्रमाणे विस्फोटक फलंदाजी करत होता, त्याचप्रकारे सोशल मीडियावरही त्याचे पोस्ट चाहत्यांची मने जिंकतात. त्यामुळेच त्याचे एकूण ४.०१ कोटी चाहते आहेत. त्याचे इंस्टाग्रामवर ५४ लाख, फेसबुकवर १.४ कोटी आणि ट्विटरवर २.०७ कोटी चाहते आहेत.
हे ३ क्रिकेटपटूही आहेत शर्यतीत
या ५ दिग्गज क्रिकेटपटूंव्यतिरिक्त आणखी काही क्रिकेटपटूही आहेत, जे सोशल मीडियावर चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडत आहेत. यामध्ये सुरेश रैनाचे (Suresh Raina) ३.११ कोटी, हरभजन सिंगचे (Harbhajan Singh) २.११ कोटी, युवराज सिंगचे (Yuvraj Singh) २.७७ कोटी आणि हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) २.०६ कोटी चाहते आहेत.
वाचनीय लेख-
-दोस्ती! एकत्र सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या जगातील ५ जोड्या, दोन आहेत भारतीय
-१ जानेवारी २०१५ रोजी आयसीसी क्रमवारीत टाॅप १०मध्ये असलेले खेळाडू आज मात्र
-आठवणीतील बॅट- ५ भारतीय क्रिकेटपटूंच्या बॅट व त्यावरील खास स्टिकर्स