---Advertisement---

सौरव गांगुलीच्या मुलीबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतलंय शिक्षण

On: रविवार, जून 6, 2021 9:34 PM
---Advertisement---

भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय सामन्यात विजय मिळवून देणारे, भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सौरव गांगुली यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये (कॅब) एन्ट्री केली होती. २०१५ ते २०१९ या कालावधीत त्यांनी कॅबमध्ये प्रशासक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गांगुलीची नेहमीच त्याच्या कामगिरीबद्दल चर्चा होत असते. त्याचे वैयक्तिक आयुष्य फारसे चर्चिले जात नाही. आज आपण त्याच्या मुलीबद्दल जाणून घेऊ.

सौरव गांगुली यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या गोड कुटुंबात पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुली यांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/CLYw4DJAEav/

सौरव गांगुलीच्या पत्नी डोना गांगुली या उत्कृष्ट ओडिसी नृत्यांगणा आहेत. यासोबतच त्यांची मुलगी सना ही सध्या शिक्षण घेत आहे. सना सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टीव्ह असते. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण ‘ला मार्टीनियर फॉर गर्ल्स’ मधून केले आहे. त्यानंतर इंटरमिडियेटसाठी ती लोरेटो हाऊस स्कूलमध्ये गेली होती. तसेच तिने आपले पुढील शिक्षण लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे. सना देखील आपल्या आईसारखी प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगणा आहे.

https://www.instagram.com/p/CAIfhD9hEqE/

तिने वयवर्ष ७ असताना नृत्यक्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यावेळी तिने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. सनाने कौशिकी चक्रवर्ती यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले आहेत. तिच्या आवडी-निवडीबद्दल बोलायचं झालं, तर तिला शॉपिंग, फिरायला आणि पोहायला खूप आवडतं. सनाने आपले वडील सौरव गांगुली यांचासोबत एका जाहिरातीत देखील काम केले आहे.

https://www.instagram.com/p/B4ZKqFJg2XD/

सनाचा जन्म ३ नोव्हेंबर २००१ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये झाला होता. सना २०१९ मध्ये चर्चेत आली होती. जेव्हा जमिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती, त्यावेळी सनाने इंस्टाग्रामवरून सीएए विरुद्ध आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर तिचे वडील सौरव गांगुली यांनी या सर्व घटनेतून तिला बाहेर काढत तिचा बचाव केला होता. त्याने म्हटले होते की, सना या सर्व राजनैतिक गोष्टी समजण्याइतकी हुशार नाही. त्यानंतर सनाने ही पोस्ट डिलिट केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट भारीच! कोहलीने काढलेल्या पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ फोटोवर भारतीय महिला खेळाडूची मन जिंकणारी कमेंट; वाचा…

व्हिडिओ : जेमिसनच्या स्विंगसमोर इंग्लिश कर्णधार निरुत्तर, दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर रूट बाद

लॉर्डसवरील कामगिरीने टीम साउदीला फायदा, इशांत शर्माला पछाडत ‘या’ यादीत केली आगेकूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---