तब्बल 10 वर्षांपासून भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहतेय, परंतु भारताचे हे स्वप्न पूर्णच होत नाहीये. अशात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामन्याद्वारे भारतीय संघापुढे आयसीसी किताब जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण या संधीचं सोनं करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. ऑस्ट्रेलिया संघाने महत्त्वाच्या सामन्यात भारताचा 209 धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघ जोरदार ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी ट्विटरवर मीम्स शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.
भारतीय संघाचा दारुण पराभव
ऑस्ट्रेलियाने भारतापुढे दुसऱ्या डावात विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारतीय संघाचा दुसरा डाव 234 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा किताब जिंकण्यात यशस्वी झाला. भारताने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात प्रवेश करूनही पराभवाचेच तोंड पाहिले. यानंतर नेटकऱ्यांनीही सोशल मीडियाद्वारे आपला राग व्यक्त केला.
ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रिया
यादरम्यान काहींनी अनुष्का शर्मा हिला भारताच्या पराभवास जबाबदार धरले. मात्र, एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुमचा संघ आणि कर्णधारच थर्ड क्लास आहे, त्यामुळे अनुष्काला दोष देऊ नका.”
No need to Blame Anushka for the loss, when you have a Third Class Team and A Captain..#INDvsAUS
— Rohit_Live (@Rohit_Live007) June 11, 2023
याव्यतिरिक्त दुसऱ्याने ट्वीट केले की, “आयपीएल जिंकणे आणि जाहिराती करणे एवढंच भारत करू शकतो. या संघात कोणतीही क्षमता नाही आणि ते पुढे जाणार नाहीत.”
All India can do is win IPL and make advertisements. There is no potential for this team and they are going no further. #INDvsAUS #WTCFinals
— I don’t even know what I am (@whatmadeyoudo) June 11, 2023
आणखी एकाने ट्वीट करत म्हटले की, “कधी पर्यंत? किती दिवस? आपण त्यांना पाठिंबा देत राहू. त्यांना पैसा, आदर, प्रसिद्धी मिळाली नाही का? आणि त्यांनी काय दिल्या जाहिराती. त्यांना कोणी प्रश्न विचारला, तर ते म्हणतात, दबाव होता. अरे भावा, तुम्ही 10 वर्षांपासून खेळताय, आताही तुम्हाला दबाव सांभाळता येत नसेल, तर मग तू सोडत का नाहीस?”
कब तक? आखिर कब तक? हम इनको सपोर्ट करते रहेंगे ,क्या नही मिला इनको पैसा, इज्जत ,शोहरत और इन्होंने क्या दिया #ads ।
कोई इनसे सवाल पूछ लो तो कहते है प्रेशर था अरे भाई तुम 10 साल से खेल रहे हो अब भी प्रेशर नहीं झेल सकते तो छोड़ क्यों नही देते?#WTCFinals #WTCFinal2023 #INDvsAUS pic.twitter.com/QNbvnZwrcl— Ghanshyam Meena???????? (@GsDausa) June 11, 2023
अजिंक्य रहाणे चमकला
अशाप्रकारे नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा मान 18 महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला मिळाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्याच्या पहिल्या डावात सर्वाधिक 89 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 129 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 11 चौकार मारले. तसेच, दुसऱ्या डावात त्याने 108 चेंडूत 7 चौकारांसह 46 धावा केल्या. यामुळे त्याच्या 135 धावा झाल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकही भारतीय खेळाडू 100 धावांचाही आकडा पार करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकूण 58, तर विराट कोहली (Virat Kohli) एकूण 63 धावा करू शकला. (third class team social media twitter reactions after india lose wtc final 2023 against australia)
महत्वाच्या बातम्या-
WTC Finalsमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज, 18 महिन्यांनी कमबॅक करणारा रहाणे दिग्गजांवर भारी
शुमबन गिलच्या वादामुळे रोहितकडून डब्ल्यूटीसीची आयपीएलसोबत तुलना! म्हणाला, ‘आमच्या इथे…’