---Advertisement---

Third T20 | टॉस तर जिंकला, आता सामना जिंकत इंग्लंड राखणार का आपली प्रतिष्ठा?

On: रविवार, जुलै 10, 2022 6:46 PM
---Advertisement---

नॉटींघम | इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात नॉटींघमच्या ट्रेंट ब्रिज येथे रविवारी (१० जुलै) तिसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. ३ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघ या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. अशात हा सामना जिंकत मालिकेत यजमान संघ व्हाईटवॉश होण्यापासून स्वत:चा बचाव करणार आहे.

या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक झाली असून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

इंग्लंडच्या संघात दोन प्रमुख बदल करण्यात आला आहे. इंग्लंडकडून फिलीप सॉल्ट आणि रिसे टॉपले यांना अंतिम एकादशमध्ये संधी देण्यात आली आहे. सॉल्टने व्हायटॅलिटी ब्लास्टमध्ये चमकदार फलंदाजी केली आहे. त्याने या टी०२ लीगमध्ये सलामीला येत फलंदाजी केली आहेत, तसेच यष्टीरक्षणही केले आहे. तर भारतीय संघात हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देत संघात एकूण चार बदल झाले आहेत. तिसऱ्या टी२० सामन्यासाठी श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक आणि रवी बिश्नोई यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

असे आहेत दोन्हीही संघ- 

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक, रवी बिश्नोई.

इंग्लंडचा संघ: जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेविड मलान, फिलीप सॉल्ट, लियाम लिविंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, डेविड विली, ख्रिस जॉर्डन, रिसे टॉपले, रिचर्ड ग्लीसन.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भुवनेश्वर कुमारच्या स्विंगमागे दडलयं कोणतं रहस्य? खुद्द ‘स्विंग किंग’नेच केला खुलासा

‘तू पूर्ण तंदुरूस्त आहेस का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना भुवनेश्वर म्हणाला, ‘सॉरी पण मी…’

आधी भारताला शिव्या घालायचा आणि आता मात्र कौतुक करतोय, पाहा पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे ट्वीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---