---Advertisement---

विरोधी संघाला पुरून उरला फिलिप्स; बनला ‘अशी’ कामगिरी करणारा टी20 विश्वचषकातील तिसराच खेळाडू

Glenn-Phillips-Record
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 27वा सामना शनिवारी (दि. 29 ऑक्टोबर) सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या शानदार कामगिरीमुळे त्यांनी श्रीलंकेला 65 धावांनी धूळ चारली आणि विश्वचषकातील दुसरा विजय मिळवला. यादरम्यान न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्स याने एक खाक कारनामा केला. अशी कामगिरी करणारा तो या विश्वचषकातील तिसरा फलंदाज ठरला.

काय आहे ग्लेन फिलिप्सचा कारनामा?
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 167 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाचा संपूर्ण डाव 102 धावांवरच संपुष्टात आला. त्यांच्या फक्त दसून शनाका (35) आणि भानुका राजपक्षे (34) या दोन फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली.

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडकडून एकट्या ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने सर्वाधिक 104 धावा चोपल्या. या धावा त्याने 64 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने चोपल्या. विशेष म्हणजे, त्याने केलेल्या धावा या श्रीलंका संघाच्या संपूर्ण धावांपेक्षाही जास्त आहेत. त्यामुळे तो या टी20 विश्वचषकात विरोधी संघाच्या एकूण धावसंख्येपेक्षा जास्त धावा करणारा तिसरा खेळाडू बनला.

यापूर्वी दोन फलंदाजांना जमला हा कारनामा
ग्लेन फिलिप्स याच्यापूर्वी हा कारनामा फक्त दोन खेळाडूंना जमला आहे. यामध्ये रायली रूसो (Rilee Rossouw) आणि पथुम निसांका  (Pathum Nissanka) यांचा समावेश आहे. रूसोने 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या टी20 विश्वचषकातील 22व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 56 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 109 धावांची शतकी खेळी साकारली होती. दुसरीकडे, बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या 101 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे रूसोने बांगलादेश संघापेक्षा तब्बल 8 धावा जास्त काढल्या होत्या.

पथुम निसांकाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने टी20 विश्वचषकातील 6व्या सामन्यात यूएईविरुद्ध 60 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार मारत 74 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, यूएई संघाचा संपूर्ण डाव 73 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे, निसांकाने यूएई संघापेक्षा 1 धाव जास्त काढली होती.

विरोधी संघाच्या धावसंख्येपेक्षाही अधिक धावा करणारे खेळाडू
ग्लेन फिलिप्स- 104 धावा, विरुद्ध- श्रीलंका (102 धावा)
रायली रूसो- 109 धावा, विरुद्ध- बांगलादेश (101 धावा)
पथुम निसांका- 74 धावा, विरुद्ध- यूएई (73 धावा)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: सामन्याआधी आफ्रिकी खेळाडूची विराटला वॉर्निंग! म्हणाला, ‘तो फॉर्ममध्ये आला असला तरी आमचे गोलंदाज….’
दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाचे मोठे विधान; म्हणाला, ‘आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---