पुणे, 1 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंट संघाने पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाचा पराभव करत स्पर्धेत तिसरा विजय नोंदवला.
घरच्या मैदानावर खेळताना शौर्य जाधवच्या झंजावाती नाबाद 172 धावांच्या जोरावर ब्रिलियंट संघाने पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाचा 226 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. वाळके क्रिकेट अकादमी मैदान येथे झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात श्रवण गालफाडेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या चंद्रोज् संघाने गॅरी कर्स्टन संघाचा 114 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् संघाने 50 षटकात 7 बाद 267धावांचा डोंगर रचला. यात श्रवण गालफाडेने 85 चेंडूत 12 चौकार व एका षटकारासह 81 धावा तर अर्जुन शेळकेने 75 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक करत संघाचा डाव बळकट केला. 267 धावांच्या आव्हानाचा सामना करताना श्रवण गालफाडे , अर्जुन शेळके व सर्वेश वाघमारे यांच्या अचूक गोलंदाजीने गॅरी कर्स्टन : 35.5 षटकांत सर्वबाद 153 अन्य लढतीत अर्जुन सोनारच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने व्हिजडम संघाचा 81 धावांनी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
चंद्रोज्: 50 षटकात 7 बाद 267धावा (श्रवण गालफाडे 81(85,12×4,1×6), अर्जुन शेळके 51(75,6×4), प्रशिक नरुटे 28(25,2×4,1×6), कुलवंश वाकोडे 3-59) वि.वि गॅरी कर्स्टन: 35.5 षटकांत सर्वबाद 153 धावा(आलाप पंगू 37(25,7×4), इद्रिस हकीम 33(35,6×4,1×6), श्रवण गालफाडे 5-22, अर्जुन शेळके 2-30, सर्वेश वाघमारे 2-32) सामनावीर- श्रवण गालफाडे
चंद्रोज् संघ 114 धावांनी विजयी
ब्रिलियंट: 50 षटकांत 2 बाद 344 धावा(शौर्य जाधव नाबाद 172(173,24×4), शिवरत्न सूर्यवंशी 76(77,11×4,1×6), पृथ्वी पालणे नाबाद 39(29,5×4), अर्णव पाटील 1-47) वि.वि पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी : 32.3 षटकांत सर्वबाद 118 धावा(अर्णव पाटील 35, प्रणव नाणेकर 4-40, कृष्णा गायकवाड 3-10, शौर्य जाधव 1-9) सामनावीर- शौर्य जाधव
ब्रिलियंट संघ 226 धावांनी विजयी
पीवायसी हिंदू जिमखाना: 44.3 षटकात सर्वबाद 215 धाव(अर्जुन सोनार 69(69,12×4), आदित डोंगरे 27, पृथ्वीराज खांडवे 3-53, अथर्व आखाडे 2-49, जयेश जोशी 2-24) वि.वि व्हिजडम: सर्वबाद 39.3 षटकात सर्वबाद 134 धावा (सर्वेश कुलकर्णी 50(65,7×4), अथर्व आखाडे 37, अर्जुन सोनार 4-13, असीम देवगावकर 2-23) सामनावीर-अर्जुन सोनार
पीवायसी हिंदू जिमखाना संघ 81 धावांनी विजयी
(Third win for brilliant team in 1st Punit Balan-Kedar Jadhav Mega Club Championship (Under 14) Cricket Tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत होता ऑस्ट्रेलियन दिग्गज, शास्त्रींनी दोन शब्दात केले शांत
मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता