विंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांची भारताविरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.
त्यामुळे या सामन्यासाठी विंडीज आणि भारतीय संघ आज(30 आॅक्टोबर) तिरुअनंतपुरम येथे दाखल झाला आहे. यावेळी विंडीजच्या संघाचे नारळपाणी देऊन अनोख्यापद्धतीने स्वागत करण्यात आले.
याचा व्हिडिओ विंडीज क्रिकेट बोर्डाने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘तिरुअनंतपुरम येथे भारताविरुद्ध पाचव्या वनडे सामन्यासाठी आगमन झाले आहे. हे ठीकाण आम्हाला घराच्या वातावरणाची आठवण करुन देतात.’
Arrived in Trivandrum ahead of 5th ODI vs India.
Location reminds us so much of home! #WindiesCricket #ItsOurGame pic.twitter.com/SRGSzLacKz— Windies Cricket (@windiescricket) October 30, 2018
भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील पाचवा वनडे सामना 1 नोव्हेंबरला तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडीयमवर होणार आहे. 5 सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.
भारताने या मालिकेतील पहिला आणि चौथा सामना जिंकला आहे, तर विंडीजने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच दुसरा सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे पाचव्या वनडेत टीम इंडियाला मालिका जिंकण्याची तर विंडीजला मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ
–२०१९ विश्वचषकात विराटला धोनीची गरज आहे, महान खेळाडूचे परखड मतं
–ते सेलिब्रेशन २० वर्षीय खलील अहमदला पडले महागात