जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध टी२० लीगमध्ये जिची गणना होते, ती लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. मागील महिन्यात पार पडलेल्या आयपीएल २०२२मध्ये खूप खेळाडू असे होते, ज्यांच्यावर फार मोठ्या बोली लावल्या गेल्या, पण ते त्या किमतीस साजेशी कामगिरी करू शकले नाही. महागडे खेळाडू विकत घेऊनही फ्रॅंचायझी त्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२३च्या लिलावात मुक्त करू शकतात.
चला तर पाहुया, असे तीन खेळाडू, ज्यांना पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२३मध्ये त्यांच्या सध्याच्या फ्रॅंचायझीने सोडले, तर त्यांना बाकी फ्रॅंचायझी मालामाल करू शकतात. कारण, त्यांना मेगा लिलाव २०२२मध्ये सुद्धा चांगली किंमत देऊन विकत घेतले गेले होते.
१. शाहरुख खान
आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या शाहरुख खान (Shahrukh Khan) याला पंजाबने मेगा लिलावामध्ये ९ कोटी रुपयात विकत घेतले होते. शाहरुख पंजाबसाठी आयपीएल २०२२मध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्याने २०२२च्या हंगामात १०८.३३च्या स्ट्राईक रेटने आणि फक्त १६.७१च्या सरासरीने ११७ धावा काढल्या. त्यामुळे कदाचित पंजाब किंग्स आयपीएल २०२३च्या लिलावात त्याला मुक्त करू शकते. शाहरुख खान आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, तो यावर्षी अपयशी ठरला, पण तरीही त्याला पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२३मध्ये चांगली किंमत देऊन विकत घेतले जाऊ शकते.
२. अब्दुल समद
अब्दुल समद (Abdul Samad) याला सनरायजर्स हैदराबादने मेगा लिलावाआधी ४ कोटी रुपयात रिटेन केले होते. समद आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, त्याला हैदराबादने २०२२च्या हंगामात फक्त २ सामने खेळवले. आता बघावं लागेल की, हैदराबाद समदला आयपीएल २०२३च्या लिलावात सोडते की नाही. जर त्याला हैदराबादने सोडले, तर त्याच्यासाठी उर्वरीत संघ चांगली किंमत मोजायला तयार असू शकतात.
३. कार्तिक त्यागी
आयपीएल २०२२ मेगा लिलावामध्ये सनरायजर्स हैदराबादने कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) याला ४ कोटी रुपयात विकत घेतले होते. मात्र, त्याला हैदराबादकडून २०२२च्या हंगामात फक्त २ सामने खेळायला मिळाले. २०२० सालच्या अंडर-१९ विश्वचषकामध्ये दमदार प्रदर्शन करत सगळ्यांचे लक्ष वेधून आपली एक विशेष ओळख बनवली होती. मात्र, जर त्याला हैदराबादने मुक्त केले, तर त्याला आयपीएल २०२३च्या लिलावामध्ये चांगली किंमत मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमाईच्या बाबतीत आयपीएल देतंय थेट इंग्लिश प्रीमियर लीगला टक्कर, खुद्द दादांनीच केले स्पष्ट
‘माझ्यासारख्या आक्रमक फलंदाजाला कोणीही रोखू शकत नाही’, मुंबईच्या तुफानी फलंदाजाचे विधान
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा