यावर्षी भारतीय संघाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यात अनेकांनी या संधीचे सोनेही केले. यात नवदीप सैनी, शिवम दुबे अशा खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय संघाकडून 2019मध्ये पदार्पण केलेले भारतीय खेळाडू –
शहाबाज नदीम – 15 वर्षांपूर्वी डिसेंबर 2004 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शहाबाज नदीमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी 15 वर्षांची वाट पहावी लागली. त्याने 19 – 22 ऑक्टोबरदरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रांचीमध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विशेष म्हणजे रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डियम नदीमचे घरचे मैदान आहे आणि याच मैदानावर त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. एवढेच नाही तर नदीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली नव्हती.
परंतू तिसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून तिसऱ्या सामन्याच्या एक दिवस आधी नदीमची भारतीय संघात निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्याला 14 तासांनंतर लगेचच 11 जणांच्या भारतीय संघात खेळण्याची संधीही मिळाली.
नवदीप सैनी – 2019 आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शेन वॉटसनला 151 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत सर्वांना प्रभावित करणाऱ्या नवदीप सैनीने याचवर्षी भारतीय संघातही स्थान मिळवले.
त्याने ऑगस्टमध्ये भारताने केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 3 ऑगस्टला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 3 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली होती.
त्याने टी20नंतर 22 डिसेंबरला वेस्ट इंडिजविरुद्धच कटक येथे झालेल्या वनडे सामन्यातून वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केले.
त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर 5 टी20 आणि 1 वनडे सामना खेळला. या 6 सामन्यात मिळून त्याने 8 विकेट्स घेतल्या.
शुबमन गिल – प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटू शुबमन गिलने 2018 ची19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा गाजवली होती. त्यानंतर त्याने देशांतर्गत आणि भारत अ संघाकडूनही चांगली कामगिरी करत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले.
त्याने न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेतून 31 जानेवारी 2019 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला खास काही करता आले नाही. त्याने पदार्पणानंतर आत्तापर्यंत 2 वनडे सामने खेळले. यात त्याने 16 धावा केल्या.
राहुल चाहर – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी करणाऱ्या 20 वर्षीय राहुल चाहरने वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी20 मालिकेतून 6 ऑगस्ट 2019ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 1 विकेट घेतली.
या सामन्यानंतर मात्र त्याला भारतीय संघाकडून यावर्षी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
मयंक मार्कंडे – 2018 चा आयपीएल मोसम गाजवणाऱ्या मयंक मार्कंडेने 24 फेब्रुवारी 2019 ला विशाखापट्टणम येथे झालेल्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
त्याने यावर्षी भारताकडून हा एकमेव सामना खेळला. मात्र या पदार्पणाच्या सामन्यात त्याला विकेटही घेता आली नाही.
शिवम दुबे – दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याऐवजी भारतीय संघात संधी मिळालेल्या शिवम दुबेने अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्याने नोव्हेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
3 नोव्हेंबर 2019 ला बांगलादेश विरुद्ध पदार्पणाचा टी20 सामना खेळताना त्याला खास काही करता आले नाही. मात्र त्याने त्यानंतर चांगली कामगिरी केली. त्याने पदार्पणानंतर 6 टी20 सामने आणि 1 वनडे सामना खेळला. टी20मध्ये त्याने 3 विकेट्स आणि 64 धावा केल्या. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासातील सर्वात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे आयसीसी
वाचा????https://t.co/fZqV5F6EcG????#Cricket #म #मराठी #TestCricket— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019
आयपीएल २०२०ची तारीख ठरली, पण संघ पडले चिंतेत, जाणून घ्या कारण
वाचा????https://t.co/zawt7JnghU????#Cricket #TeamIndia #म #मराठी #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019