---Advertisement---

भारतासाठी धोका! 7 डाव.. 2 शतके आणि 1 अर्धशतक ‘हा’ आफ्रिकन फलंदाज 6 वर्षांनंतर संघात

On: रविवार, ऑक्टोबर 30, 2022 9:56 AM
South Africa
---Advertisement---

टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) तीन सामने खेळले जाणार आहेत. यातील तिसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना जो जिंकेल तो उपांत्य फेरी गाठणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. भारत सुपर 12चे पहिले दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पर्थची खेळपट्टी पाहिली तर वेगवान आणि उसळी घेणारी आहे, हेच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हवे आहे. यामुळे केवळ दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजच भारताची कसोटी पाहतील असे नाही. त्यांच्या संघातील एक फलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.

दक्षिण आफ्रिकेच्या त्या फलंदाजाने 6 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केले आहे. त्याचे नाव रायली रुसो (Rilee Rossouw). तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध 109 धावा केल्या. याबरोबरच तो फ्रांसच्या गुस्ताव मॅक्योन सोबत टी20मध्ये लागोपाठ शतके करणारा दुसरा फलंदाज ठरला. रुसोने त्याचे पहिले शतक भारताविरुद्ध इंदोरच्या टी20 सामन्यात केले होते. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील दुसरे शतक ठरले. त्याने जेव्हापासून दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केले आहे तेव्हापासून त्याने 7 डावांमध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक केले आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध कार्डिफमध्ये नाबाद 96 धावांची खेळी केली होती.

रुसोनो टी20मधील सर्व शतके 2019नंतर केली
रुसोच्या टी20 प्रकारची फलंदाजी पाहिली तर त्याने 2019पासून 5 शतके केली. या काळात त्याने 39च्या सरासरी आणि 157च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याआधी त्याची सरासरी 26 आणि स्ट्राईक रेट 131 होता. यावरून त्याचा टी20 प्रकारातील खेळ बराच बदल्याचे दिसत आहे. त्याने चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवरही उत्तम कामगिरी केली आहे. त्याची 2014 ते 2016 पर्यंतची आंतरराष्ट्रीय टी20मधील कामगिरी पाहिली तर तो 2022मध्ये त्याची आकडेवारी चकित करणारी आहे. त्याने 2014-16मध्ये 14 डावांमध्ये दोनच अर्धशतके केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ड्युरासेल’ म्हणून ओळखले जाणारे कर्टनी वॉल्श
मिताली राज करतेय नव्या क्षेत्रात पदार्पण! मुहूर्तही ठरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---