क्रिकेटरसिंकाना सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची प्रतिक्षा आहे. १८ ते २२ जून या कालावधीत द रोज बाउल स्टेडियम, साउथम्टन येथे हा चुरसीचा सामना रंगणार आहे. उभय संघांनी फार पुर्वीच या सामन्यासाठीचे संघ जाहीर केले आहेत. त्यामुळे आजी-माजी खेळाडू पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याबद्दल मते मांडत आहेत. अशात इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने भारतीय संघाचा ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकणाऱ्या खेळाडूने नाव सांगितले आहे.
पानेसरच्या मते आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन्हीही अष्टपैलू खेळाडूंना भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या ताफ्यात जागा मिळावी. परंतु अश्विनपेक्षा जास्त जडेजाने पानेसरला प्रभावित केले आहे. त्याचे आयपीएल २०२१ मधील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील अष्टपैलू प्रदर्शन पाहता तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकत असल्याने पानेसरने सांगितले आहे.
पानेसर म्हणाला की, “माझ्यासाठी रविंद्र जडेजा हा भारताचा एक्स फॅक्टर असेल. तो आयपीएल २०२१ पासून शानदार फॉर्ममध्ये आहे. जर भारतीय संघाने केवळ एका फिरकीपटूसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मी आर अश्विनऐवजी जडेजाला निवडेल. जडेजामध्ये रक्षात्मक गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. सोबतच तो डावखुरा गोलंदाजही आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याचा भरपूर फायदा होईल.”
इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे जडेजा
मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला जडेजा दुखापतीमुळे मुकला होता. मात्र, त्यानंतर आयपीएल २०२१ त्याने आपला शानदार फॉर्म दाखवला. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने दिमाखदार कामगिरी केली. चेन्नी सुपर किंग्जकडून ७ सामने खेळताना त्याने १३१ धावा ६ विकेट्स घेतल्या. त्यातही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या षटकात त्याने केलेली फटकेबाजी कोणीही विसू शकणार नाही. सोबतच त्याने काही सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षणाही केले होते.
पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात तो खेळताना दिसेल. यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत देखील तो भारताचे प्रतिनिधित्व करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी न्यूझीलंडचा ‘हा’ क्रिकेटपटू चढला बोहल्यावर, शेअर केला लग्नाचा फोटो
संकटमोटक! पंतच्या ३ खास खेळी, जेव्हा कठीण परिस्थितीत विरोधकांची धुलाई करत जिंकले होते सामने
जमतंय की! ‘मिसेस बुमराह’च्या सुपरकूल डान्सने जिंकली चाहत्यांची मने, बघा भारी व्हिडिओ