---Advertisement---

‘हा’ फलंदाज घेऊ शकतो रिषभ पंतची जागा, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये

On: सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 12:51 AM
N. Jagadeesan
---Advertisement---

भारताबाहेरील मैदानावर यष्टीरक्षक रिषभ पंत याच्या खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघ चिंतेत आहे. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक युवा यष्टीरक्षक फलंदाज शतकांवर शतके मारत आहे. चेन्नई सुपर किंग्ज या संघातर्फे खेळलेला तामिळनाडूचा सलामीवीर नारायण जगदीशन याने मागच्या 7पैकी 5 सामन्यात शतके झळकावली. त्याच्या या धमाकेदार प्रदर्शनामुळे संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. सौराष्ट्र संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात एन. जगदीशन याच्यावर सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

तामिळनाडू संघ ग्रुप ‘सी’ च्या अव्वल स्थान मिळवत सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात संघानेे विजय मिळवला आणि उर्वरीत 2 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. तामिळनाडू संंघाने आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश या संघाविरुद्ध विजय मिळवला, तर बिहार आणि केरळ यांच्याविरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. ज्या 5 सामन्यात संघाने विजय मिळवला त्या सर्व सामन्यात नारायण जगदीशन याने झंझावती शतके झळकावली.

सध्या जगदीशन धमाकेदार फॉर्ममध्ये
या स्पर्धेत जगदीशनने आतापर्यंत धमाकेदार प्रदर्शन केेले आहे. बिहार विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतरच्या सलग 5 सामन्यात जगदीशनने शतकीय खेळी केल्या. आंध्रप्रदेश विरुद्ध नाबाद 114 धावा, छत्तीसगड विरुद्ध 107 धावा, गोवा संघाविरुद्ध 168, हरियाणा विरुद्ध 128 धावा आणि अरुणाचल प्रदेश विरुद्ध रेकॉर्डब्रेक 277 धावा केल्या. ‘अ’ दर्जाच्या या सामन्यात कोणत्याही फलंदाजाने खेळलेला सगळ्यात मोठा डाव आहे. खेळलेल्या 7 सामन्यात आतापर्यंत जगदीशनने 164.40च्या सरासरीने 822 धावा केल्या.

जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग 5 शतके लगावत विराट कोहली समवेत बऱ्याच फलंदाजांना मागे सोडले. त्याचबरोबर जगदीशनन अ दर्जाच्या सामन्यात सलग 5 शतके ठोकणारा पहिला फलंदाज बनला. या युवा फलंदाजाने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा के एलबीरो पीटरसन याच्या अ दर्जाच्या सामन्यात सलग 4 शतकांचा विक्रम मोडून काढला. तसेच एकाच हंगामात 5 शतकीय खेळी करत विराट कोहली, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पड्डीकल यांना मागे सोडले.(This Batsman can replace Rishabh Pant in Indian Team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर विलियम्सनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मागच्या सामन्यात…’
तो हवाच! सातत्याने अन्याय होत असलेल्या संजूला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---