सिने कलाकार, करण वाही याला तुम्ही अनेकदा छोट्या पडद्यावर झळकताना पहिले असेल. ‘दावत ए इश्क’ चित्रपट आणि ‘सॅक्रेड गेम्स’ सारख्या वेब सीरिज मधून आपल्या अभिनयाच्या कौशल्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या करणला आधी अभिनेता नव्हे तर क्रिकेटपटू व्हायचे होते, हे अनेक चाहत्यांना माहीत नसेल. याचा खुलासा त्याने स्वतःच केला आहे.
क्रिकेटमध्ये यशाच्या शिखरावर असलेला शिखर धवन आणि करण वाही हे दोघेही खूप चांगले मित्र आहे. या दोघांची ओळख क्रिकेटमुळेच झाली होती. अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या करणने क्रिकेटमध्येही आपले नशीब आजमावून पाहिले होते. परंतु त्याला क्रिकेटमध्ये लांब लांब पर्यंत आपले भविष्य दिसून येत नव्हते. त्यामुळे त्याने अभिनय आणि मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्याने दिल्ली संघासाठी १९ वर्षांखालील क्रिकेट खेळले आहे.
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी दिल्लीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघासाठी खेळलो आहे. तसेच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठीही खेळलो आहे. परंतु मला जास्त पुढे जाता आलं नाही. ही एक अविस्मरणीय आठवण आहे, जी नेहमी माझ्या लक्षात राहील. कारण क्रिकेट सोडण्याचा पश्चात्ताप मला आजही आहे. मला क्रिकेटपटू व्हायचे होते. मी शिखर धवन सोबत खेळलो आहे. तो माझा मित्र होता. मी २००३ मध्ये क्रिकेट खेळणे सोडले होते. तेव्हा इंटरनेटही नव्हते.”
शिखर धवनच नव्हे तर, करण विराट कोहलीचा ही चांगला मित्र आहे. असे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. त्याने रेडियोसिटी ९१.१ एफएमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “विराट आणि मी चांगले मित्र आहोत. तसेच आम्हा दोघांना खायला खूप आवडते.”
क्रिकेटमध्ये भविष्य दिसत नसल्याने, करणने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने २००४ मध्ये ‘ रिकिक्स ‘ या शो मधून अभिनय क्षेत्रात पाय ठेवले होते. परंतु त्याला यश तेव्हा मिळाले जेव्हा त्याने २००९-१० मध्ये टीवी सीरीज ‘दिल मिल गए’ मध्ये काम केले.
याव्यतिरिक्त,त्याने ‘कुछ तो लोग कहेंगे’ (२०११), ‘तेरी मेरी लव्ह स्टोरीज’ (२०१२) या सीरिजमध्ये ही काम केले. तसेच तो ‘दावत ए इश्क’ (२०१४) या चित्रपटात झळकला आहे. तसेच २०१८ मध्ये गाजलेली वेब सिरीज ‘सॅक्रेड गेम्स’मध्ये ही त्याने अभिनय केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने
बुमराहच्या पोस्टवर अक्षर पटेलची मजेशीर कमेंट, मिर्झापूरचा संवाद वापरत म्हणाला…
ख्रिस्टियानो रोनाल्डोबाबत कोहलीने गूगलवर सर्च केली होती ‘ही’ गोष्ट