मुंबई । भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू इशांत शर्माने आज एका ट्रोलरला इंस्टाग्रामवर चांगलेच खडसावले. पत्नी प्रतिभा सिंगच्या फोटोवर कंमेंट करणाऱ्या या चाहत्याला ही कंमेंट चांगलीच महागात पडली आहे.
व्यावसायिक बास्केटबॉलपटू असणाऱ्या इशांत शर्माच्या पत्नी प्रतिभाने आज सामन्याला जाण्यापूर्वी एक खास फोटो शेअर केला.
https://www.instagram.com/p/BeCccf0HGwV/?taken-by=pratima0808
यावर इशांतनेही एक चांगली कंमेंट केली. ज्यात इशांत म्हणतो, “Winner.. dekh kar khelo!! Kyu South Africa mai tension de rahi ho”
यावर एका ट्रोलरने चुकीच्या कंमेंट केल्यामुळे इशांत चांगलाच भडकला. त्याने या ट्रोलरला चांगलेच खडसावले.
या ट्रोलरला इशांतने असे दिले उत्तर @mr.jaat.ji007 beta tu apna dekh!! Or kam bol subah subah deemag kharab karega toh india aakar tujhse hi hisab loonga!! Or agar itni tension hai toh ja mandir or prasad chada ki hum haare na!! Warna chup baith mummy ki godh mai or comment kar
भारतीय संघ सध्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलाच संकटात सापडला आहे. त्यात इशांत शर्माचा चांगल्या लयीत असणाऱ्या भुवीच्या जागी संघात समावेश केल्यामुळे या निर्णयावर मोठी टीका होत आहे.