जागतिक क्रिकेटमध्ये भारताने पदार्पण केल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांचे प्रचंड वर्चस्व राहिले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जो काळ सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गज फलंदाजांनी खेळला तो खूपच सुवर्णकाळ होता.
भारतीय फलंदाजीचे प्रतिनिधित्व जेव्हा या बड्या खेळाडूंकडे होत तेव्हा संघाची फलंदाजी चांगल्या प्रकारे दिसत होती. त्यांच्या पुढे गोलंदाज टिकणे सोपी गोष्ट नव्हती.
भारताच्या सचिन-द्रविडसह ४ फलंदाजांना ह्या गोलंदाजाने सलग ४ चेंडूंत पॅव्हेलियनची वाट दाखवली…
या फलंदाजांच्या काळात, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरसारख्या फलंदाजांना बाद करत एखादा गोलंदाज ४ चेंडूत ४ बळी घेत असेल तर त्या गोलंदाजाला काय म्हणावे, तो गोलंदाज खरोखरच खूप खास असेल. ज्याने या दिग्गज भारतीय फलंदाजांसहित ४ चेंडूत ४ बळी घेतले.
सराव सामन्यात हॅम्पशायर संघाच्या गोलंदाजाने केली उत्तम कामगिरी
११९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात असा कारनामा एका गोलंदाजाने केला. हा सामना आंतरराष्ट्रीय सामना नसला तरी आंतरराष्ट्रीय मालिकेच्या दरम्यान हा सराव सामना आयोजित केला गेला होता. त्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने ४ चेंडूत भारताचे ४ फलंदाज माघारी पाठवले होते.
१९९६ च्या विश्वचषकात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ निराश झाला होता. त्या विश्वचषकानंतर मे १९९६ मध्ये भारतीय संघ मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात इंग्लंडला जाणार होता. इंग्लंडमध्ये ६५ दिवसांच्या दौऱ्यात भारताला ३ कसोटी, ३ एकदिवसीय तसेच सराव सामान्यांना मिळून एकूण १२ सामने खेळावे लागणार होते.
भारताचा सराव सामना हॅम्पशायरविरुद्ध
इंग्लंड दौर्यावर भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि संघाचा वरिष्ठ खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद झाला म्हणूनच सिद्धू भारतात परतला. यानंतर सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दोन युवा खेळाडूंना संघात स्थान मिळालं. पहिल्या दोन कसोटींनंतर भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर होता. तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला हॅम्पशायर संघाविरुद्ध सराव सामना खेळायचा होता.
या सामन्यात जिथे सौरव गांगुली आणि राहुल द्रविडला संधी मिळाली तेथे त्यांनी शानदार पदार्पण केले त्यामुळे तिसर्या कसोटीत त्यांचे स्थान निश्चित होते. तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ हॅम्पशायरविरुद्ध सराव सामन्यासाठी मैदानात उतरला. या सराव सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन संघात नव्हता मग सचिन तेंडुलकरच्या हाती कर्णधारपद आलं. हॅम्पशायरविरुद्ध भारतीय संघाला जास्त त्रास सहन करावा लागेल अशी अपेक्षा कोणी केली नव्हती.
केवान जेम्सने जमलेली जोडी तोडली, जडेजाला केलं आउट
सराव सामना २९ जून १९९६ रोजी साउथॅम्प्टनमध्ये हॅम्पशायर विरूद्ध सुरू झाला. हॅम्पशायरने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले आणि भारताकडून विक्रम राठोड व अजय जडेजाने पहिल्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाची स्थिती बळकट होताना दिसत होती.
यानंतर ४ चेंडूत ४ बळी घेणारा गोलंदाज
दुपारच्या जेवणानंतर हॅम्पशायरचा कर्णधार स्टीफनसनने ३५ वर्षीय फिरकी गोलंदाज केवान जेम्स (Kevan James) च्या हाती चेंडू दिला. ज्याने काही षटके टाकली होती. सर्व हॅम्पशायर संघातील गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर केवान जेम्सवर दबाव होता पण केवान जेम्स पुढे इतिहास घडवणार आहे हे कोणाला ठाऊक..! त्याने गोलंदाजीला येताच खेळपट्टीवर जम बसवलेल्या अजय जडेजाला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पडले. जडेजाच्या चुकीमुळे त्याला विकेट मिळाली.
पहिली विकेट
त्यानंतर सौरव गांगुली फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या २०० च्या वर गेली होती. विक्रम राठोड ९५ धावांवर फलंदाजी करीत होता. केवान जेम्स गोलंदाजीसाठी परत आला. त्याच्या समोर विक्रम राठोड होता. यष्टीरक्षक एडी दबाव बनवण्यासाठी पुढे आला आणि त्याच चेंडूवर केवान जेम्सला राठोडची विकेट मिळाली. राठोडला एडीने यष्टीचीत केले.
दुसरी विकेट
यानंतर कर्णधार सचिन तेंडुलकर फलंदाजीस उतरला. दोन विकेट पडल्यानंतर, हॅम्पशायरने दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट लेगमध्ये एक फील्डर उभा केला. केवान जेम्सचा दुसरा आणि सचिनचा पहिलाच चेंडू, सचिनने तो खेळला आणि चेंडू सरळ शॉर्ट लेगमध्ये गेला. मैदानात शांतता पसरली आणि हॅम्पशायरचे खेळाडू आनंदाने उडी मारायला लागले. त्यांना सचिनची विकेट मिळाली.
तिसरी विकेट
पदार्पणाच्या कसोटीत राहुल द्रविडने चमकदार कामगिरी केली होती आणि तो आता फलंदाजीला आला होता. केवान जेम्सने हा चेंडू सरळ टाकला आणि चेंडू द्रविडच्या पॅडला लागला. जोरदार अपील केल्यावर पंचानी बोट उंचावलं. द्रविडही पहिल्याच चेंडूवर माघारी फिरला आणि केवानने हॅटट्रिक केली. कधीही आंतरराष्ट्रीय किंवा क्लब क्रिकेट न खेळणार्या गोलंदाजाला हे सौभाग्य मिळाल.
चौथी विकेट
सलग तीन चेंडूवर तीन गडी बाद झाल्यावर संजय मांजरेकर फलंदाजीला आले. केवनच्या पहिल्याच चेंडूवर संजय मांजरेकरही झेलबाद झाले. संजय मांजरेकर बाद झाले. केवानने ४ चेंडूंत ४ गडी बाद केले. स्वप्नातही त्याने अशा गोलंदाजीचा कधी विचार केला नव्हता.
पाचव्या चेंडूवर गांगुली बाद होता-होता वाचला. कव्हर्स क्षेत्रात चेंडू गेला परंतु थोडक्यात त्याचा झेल क्षेत्ररक्षकापासून थोडा दूर राहिला. अशाप्रकारे, केवानने यशस्वी षटक पूर्ण केले ज्यामध्ये त्याने ४ चेंडूत ४ बळी घेतले. विशेष म्हणजे या सामन्यात केवानने शतकही केले.
केवान जेम्स यानंतर बीबीसी न्यूजचे एक रिपोर्टर म्हणून काम करू लागला. काही वर्षानंतर २००४ मध्ये जेव्हा केवन जेम्स सौरव गांगुलीला भेटला, तेव्हा केवाननी सौरव गांगुलीला ४ चेंडूत 4 बळी ह्या घटनेची आठवण करून दिली. गांगुलीच्या नेतृत्वात भारत इंग्लंड दौर्यावर होता. तिथे सामन्यापूर्वी त्याची पत्रकार परिषदेत केवान जेम्स यांची भेट झाली होती.
केवान सौरव गांगुलीकडे गेला आणि म्हणाला, “केवन जेम्स बीबीसी,” तेव्हा गांगुलीने विचारले, “कोण ४ चेंडूत ४ विकेट वाले?” गांगुली असे बोलताच तिथे उपस्थित सर्वजण केवानकडे पाहू लागले.
पत्रकार परिषदेनंतर जेव्हा केवाननी गांगुलीची भेट घेतली तेव्हा त्यांनी विचारले की “तुला अजूनही लक्षात आहे” मग दादा म्हणाला “मी अशा गोष्टी विसरत नाही.” केवान म्हणाला, “गली क्षेत्रात तुमचा झेल सुटला होता.” यानंतर गांगुलीने लगेचच “गल्ली नाही कव्हर्स” असे म्हटले.