भारतात वर्षाच्या अखेरीस वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्यानुसार, भारतीय संघ यावर्षी आपल्या देशात होणाऱ्या विश्वचषक 2023मध्ये विजय मिळवू शकतो. कैफच्या मते, भारतीय संघाकडे असे खेळाडू आहेत, जे भारताला विश्वचषक जिंकून देऊ शकतात.
घरच्या मैदानावर खेळण्याचा मिळेल फायदा
माध्यमांशी बोलताना माजी खेळाडू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) म्हणाला की, “भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळेल. आपल्याकडे विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. कारण, आपण मायदेशात खेळत आहोत. आपल्याला इतर संघांच्या तुलनेत परिस्थितीची चांगली जाण आहे. इथे फिरकीपटू मोठी भूमिका बजावू शकतात. आपल्याकडे असे काही खेळाडू आहेत, जे विश्वचषक जिंकून देऊ शकतात.”
‘विराट आणि रोहितला बजवावी लागेल मोठी भूमिका’
पुढे बोलताना कैफने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल. त्यांना पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल आणि भारताला विश्वचषक जिंकून द्यावा लागेल.”
फिटनेस ठरले महत्त्वाचा
कैफने यावेळी भारतीय खेळाडूंच्या फिटनेसविषयीही महत्त्वाचे भाष्य केले. तो म्हणाला की, “सर्वात मोठे आव्हान हे आहे की, आपले मोठे खेळाडू पूर्णपणे फिट व्हावेत आणि फॉर्ममध्ये असावेत. जर आपण चांगली फलंदाजी करू शकलो, तर आपल्याला पराभूत करणे सोपे नसेल.”
‘बुमराह असेल हुकमी एक्का’
कैफने पुढे म्हटले की, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विश्वचषकासाठी फिट असेल, तर भारतीय गोलंदाजी विभाग चांगला होईल. अशात कैफने म्हटले की, “बुमराह आशिया चषकातून पुनरागमन करू शकतो. जर बुमराह परत आला, तर भारताला पराभूत करणे खूपच कठीण होईल. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी अलीकडील दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये जर बुमराहही सामील झाला, तर हा एक संतुलित संघ बनेल.”
विशेष म्हणजे, बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने सप्टेंबर 2022नंतर एकही सामना खेळला नाहीये. वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. तसेच, स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्याला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळला जाईल. (this former cricketer big predication team india will win world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
ऍशेस मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला सचिनचा मोलाचा सल्ला! वाचा काय म्हणाला मास्टर ब्लास्टर
रिषभ पंतचे ग्राउंडवर कमबॅक! खास सामन्यासाठी हार्दिक पंड्यासोबत लावली हजेरी