एकूण 10 संघांनी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. यातील काही संघ असे आहेत, ज्यांचे स्क्वॉड खूपच मजबूत असल्याचे दिसत आहेत. मात्र, पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे स्क्वॉड तितके संतुलित वाटत नाहीये. तसेच, संघाची मधली फळी आणि फिरकी विभागही तितका मजबूत दिसत नाहीये. असे असूनही भारतीय संघाच्या माजी खेळाडूला वाटते की, ऑस्ट्रेलिया संघ आधीसारखा मजबूत वाटत नसला, तरीही ते अव्वल 4मध्ये पोहोचले, तर ते खूपच खतरनाक ठरू शकतात.
भारतीय माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने युट्यूब चॅनेलवर बोलताना मान्य केले की, ऑस्ट्रेलिया संघ कदाचित सध्याच्या विश्वचषकातील सर्वात मजबूत संघ नसेल, पण त्यांना लय सापडली, तर नॉकआऊटमध्ये सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच राहू शकतात. आकाश चोप्रा म्हणाला, “ऑस्ट्रेलिया संघ अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. मला वाटते की, स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल मिळून ऑस्ट्रेलियाला अंतिम चारमध्ये घेऊन जातील. जर पिवळ्या रंगाचा हा संघ अंतिम चारमध्ये पोहोचला, तर ते नॉकआऊटमध्ये खूपच खतरनाक ठरेल.”
विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ
विशेष म्हणजे, वनडे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी सर्वाधिक 5 वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यांनी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 या हंगामांचा किताब आपल्या नावे केला आहे. मात्र, सध्याचे स्क्वॉड आधीसारखे मजबूत दिसत नाहीये. तसेच, संघ अलीकडेच दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध सलग 2 वनडे मालिका पराभूत झाला आहे. अशात सहाव्यांदा किताब जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला उच्च दर्जाचा खेळ खेळावा लागणार आहे.
विश्वचषक 2023साठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, मार्नस लॅब्यूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा आणि मिचेल स्टार्क. (this former indian cricketer picks australia as a team that can dominate the knockouts in world cup 2023)
हेही वाचा-
VIDEO: हॉकीच्या मैदानावर क्रिकेटपटूंनी वाढवला हौसला! हरमन सेनेने चिरडले पाकिस्तानचे आव्हान
विश्वचषक 2011मध्ये सचिनने दिलेला ‘विमानतळावर हेडफोन घालण्याचा’ सल्ला, युवराजचा खुलासा