तब्बल २० वर्षानंतर विश्वचषक जिंकल्याने फ्रांसच्या संघात अनेक खेळाडू स्टार खेळाडू म्हणून पुढे आले. त्यातच एक तरुण खेळाडू सुद्धा चमकला तो म्हणजे बेंजामिन पवार्ड.
अनेकांना कायलीन एमबाप्पे, ग्रिझमान, उमतीती, किंवा पोग्बा फ्रांसचे प्रमुख खेळाडू वाटत असताना अर्जेंटिना विरुद्ध गोल करत पवार्डने आपली उपस्थिती प्रकाशझोतात आणली.
मोनॅकोतर्फे खेळणारा सिडीबी फ्रांसची पहिली पसंती होती परंतु त्याच्या दुखापतीमुळे पवार्डला पहिल्या ११ मध्ये संधी मिळाली.
२०१६च्या युरोच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रांसला हरवले तेव्हा हा खेळाडू फॅन पार्कमध्ये मित्रांबरोबर सामना बघायला गेला होता आणि आज अवघ्या २ वर्षात तोच खेळाडू विश्वविजेत्या फ्रांसच्या पहिल्या ११ खेळाडूंमध्ये होता.
२०१६ मध्ये स्टुटगार्ट या जर्मन क्लबतर्फे पदार्पण करणाऱ्या पवार्डला जर्मनीचा सर्वात मोठा क्लब बायर्न म्युनिकसोबत करारबद्ध करण्याच्या मार्गावर आहे.
पवार्डने फ्रांसतर्फे आजपर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात फ्रांस अपराजित राहीले आहेत. त्याने फ्रांसच्या विविध संघातर्फे खेळलेले सामने खालील प्रमाणे:-
१९ वर्षाखालील संघात
४ सामने
४ विजय
२१ वर्षाखालील संघात
१५ सामने
१२ विजय
३ सामने बरोबरीत
फ्रांसच्या प्रमुख संघात
१२ सामने
१० विजय
२ सामने बरोबरीत
महत्त्वाच्या बातम्या:
-Video: यष्टीरक्षक धोनीच्या चातुर्याने इंग्लंडचा हा फलंदाज झाला धावबाद
-केएल राहुलसाठी चाहते मैदानात, विराट कोहली आणि रवी शास्त्रींवर जोरदार टिका
-नेल्सन मंडेलांच्या 100व्या जन्मदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टरने व्यक्त केल्या भावना