भारतीय महिला संघात अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत, ज्या खूप सुंदर आहेत. त्यामध्ये एक अशी महिला क्रिकेटपटू आहे, जी बॉलिवुड अभिनेत्र्यांपेक्षाही कमी नाही. ती महिला क्रिकेटपटू इतर कोणीही नसून २४ वर्षीय प्रिया पुनिया आहे. ती मैदानावर आपल्या धडाकेबाज खेळीने चौकार- षटकारांचा पाऊस पाडते. याव्यतिरिक्त ती आपल्या सुंदरतेने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करते.
https://www.instagram.com/p/B4BRrLWpmWI/?utm_source=ig_web_copy_link
भारताकडून खेळलेत आतापर्यंत ५ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने
प्रियाने भारतीय महिला संघाकडून आतापर्यंत ५ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात तिने वनडेत ४३.७५ च्या सरासरीने ७५ धावा केल्या आहेत. तसेच, टी२०त तिने केवळ ९ धावा केल्या आहेत. नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात तिने नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
https://www.instagram.com/p/B3o0Cl3F4WR/?utm_source=ig_web_copy_link
तिच्या वैयक्तिक आयुष्यावर टाकलेली एक नजर
– प्रियाचा जन्म ६ ऑगस्ट १९९६ ला जयपूर, राजस्थान येेथे झाला.
-प्रियाने आपल्या वयाच्या ७ व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
https://www.instagram.com/p/B2d6WAfleI5/?utm_source=ig_web_copy_link
-सुरुवातीला तिने एक मुलगी असल्यामुळे क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी सराव खेळपट्टी तयार करण्यासाठी आपले घर विकले होते.
https://www.instagram.com/p/B2PCQpqFWlO/?utm_source=ig_web_copy_link
-प्रियाने दिल्लीतील जिझस आणि मेरी कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी मिळविली.
https://www.instagram.com/p/B19UEQZlD35/?utm_source=ig_web_copy_link
-तिला सिनेमाबरोबरच पंजाबी संगीत ऐकण्यास खूप आवडते.
https://www.instagram.com/p/B159n7AlDDN/?utm_source=ig_web_copy_link
-फलंदाजी करताना डाव्या पायाला लेग गार्ड घालणे ही तिची एकमेव अंधश्रद्धा आहे.
-प्रियाला हरमनप्रीत कौरच्या विशाल षटकारांनी भुरळ घातली आहे. तसेच, विराट कोहली तिचा रोल मॉडेल आहे, तर राहुल द्रविडला खेळताना पाहत ती मोठी झाली आहे.
https://www.instagram.com/p/B109-eZFnER/?utm_source=ig_web_copy_link
-तिने ६ फेब्रुवारी २०१९मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
https://www.instagram.com/p/B1kueWPl3ay/?utm_source=ig_web_copy_link
-आयपीएल २०१९मध्ये सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी संघात झालेल्या सामन्यात तिला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले होते.
https://www.instagram.com/p/B0yadRLJwVn/?utm_source=ig_web_copy_link
-क्रिकेट व्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि लॉन टेनिसदेखील खेळते.
https://www.instagram.com/p/B0xeYlWpkDQ/?utm_source=ig_web_copy_link
-प्रियाने ९ ऑक्टोबर २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेत पदार्पण सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार मिळविला होता.
https://www.instagram.com/p/Bz5hhpaFMfc/?utm_source=ig_web_copy_link