भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले असून उपांत्य फेरीतही स्थान निश्चित केले आहे. मात्र, भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ अद्याप विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करू शकलेला नाही. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर आज न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. त्याचबरोबर इंग्लंडला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभूत कराने लागणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचून भारताचा सामना करावा, अशी अनेक क्रिकेट दिग्गजांची इच्छा आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सौरव गांगुली (Sourav Ganguly) यानेही पाकिस्तानला उपांत्य फेरीत पाहायचे असल्याचे सांगितले.
स्पोर्ट्स तकशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “पाकिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठावी आणि भारताशी खेळावे अशी माझी इच्छा आहे. यापेक्षा मोठा उपांत्य फेरी सामना असूच शकत नाही.”
त्याचबरोबर गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल आणि विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांबद्दलही बरेच काही सांगितले आहे. तो म्हणाला, “भारतीय संघ विश्वचषक जिंकला नाही तर आश्चर्य वाटणार नाही. हे खेळात घडते. भारतीय संघ ज्याप्रकारे खेळत आहे त्यावर संपूर्ण देश खूश आहे. त्यांनी ज्या प्रकारे आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यात इतर संघांपेक्षा खूप फरक आहे. मला आशा आहे की ते असेच खेळत राहतील. मला वाटत नाही की खेळाची पातळी अचानक इतकी घसरेल की ते वाईट क्रिकेट खेळायला लागतील.”
भारतीय संघाला आता 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. (This Indian legend wants to watch the India vs Pakistan semi-final match Said Greater than this)
म्हत्वाच्या बातम्या
बटलर होणार इंग्लंडच्या कर्णधारपदावरून पायउतार? ECB प्रमुख भारतात दाखल
वर्ल्डकप 2023मध्ये श्रीलंकेचा लाजीरवाणा विक्रम, पाहून कुसलसेनेला स्वत:चीच वाटेल लाज!