तुफानी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला आपण या आधी अशी कामगिरी करताना कधी पहिले आहे का? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यात ग्लेन मॅक्सवेल हा व्हिडिओ गेम साठी शूट करत आहे. शूटिंग करता करताच ग्लेन मॅक्सवेल अचानक आपल्या सहकाऱ्यांची नक्कल करून दाखवायला लागला.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड क्रिकेट आणि मेलबर्न स्टुडिओ बिग एकत्रित येऊन एक व्हिडिओ गेम बनवत आहेत. ज्याच्या शूटिंगसाठी मॅक्सवेल काम करत होता. तेव्हा मिळालेल्या फावल्या वेळात मॅक्सवेलने स्वतःच्या संघातील खेळाडूंसह बाकीच्या संघातील खेळाडूंची ही नक्कल करून दाखवली.
त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या फलंदाजीच्या शैलीची नक्कल करताना दाखवून दिले की कश्या पद्धतीने स्मिथ खेळतो. त्यानंतर त्याने सर रवींद्र जडेजा जसा अर्धशतक झाल्यानंतर बॅटची तलवार करून ती फिरवतो ते ही करून दाखवण्याचा प्रयन्त केला. पण त्याला ते जमले नाही व त्याच्या हातून बॅट सटकली.अन्य काही खेळाडूंच्या फलंदाजीतील प्रसिद्ध फटक्यांची त्याने नक्कल केली. त्यात तिलकरत्ने दिल्शानचा दिलस्कुप , ब्रायन लाराचा पूल शॉट, जयसूर्याचा पॉईंट वरील स्मॅश, सेहवागची स्केयर ड्राइव्ह, मायकल बेवनचा लेट कट, या फटक्यांचा समावेश होता.
पहा काय आहे ते ट्विट
This is absolute gold from @Gmaxi_32! Check out his impersonations of @stevesmith49 and @phandscomb54 … and just wait for his JL! 😂 pic.twitter.com/7SKrL5HzlE
— cricket.com.au (@cricketcomau) September 18, 2017
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने मालिकेत १-० अशी बढत मिळवली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना २१ सप्टेंबर रोजी इडन गार्डन कोलकाता येथे होत आहे.