---Advertisement---

फक्त हार्दिक नव्हे हार्दिक २.० व्हर्जन म्हणा! गुजरात टायटन्सचा कर्णधार प्रत्येक विभागात दाखवतोय चमक

On: शुक्रवार, एप्रिल 15, 2022 12:35 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये नवा गुजरात टायटन्स संघ हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखाली शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. परंतु आता आयपीएलमधून त्याने दमदार पुनरागमन केले आहे. गुजरात संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्याच्या प्रदर्शनात आणखी सुधारणा झाल्या आहेत. गुरुवारी (१४ एप्रिल) तर त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार खेळी करत संघाला ३७ धावांनी विजय मिळवून दिला. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय होता.

हार्दिकने (Hardik Pandya) या सामन्यात फलंदाजी करताना ५२ चेंडूंमध्ये नाबाद ८७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ८ चौकार मारले. तसेच २.३ षटके गोलंदाजी करतानाही त्याने १८ धावा देत १ विकेट घेतली. यापूर्वीच्या सामन्यांमध्येही त्याने संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता. त्यामुळे यंदा त्याचे व्हर्जन २.० (Hardik Pandya 2.0 Version) दिसत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याला ही उपमा देण्यामागची काही समर्पक कारणे आपण पाहूया…

१. कर्णधार म्हणून बदललंय रूप-
हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळतो आहे. नेतृत्त्वाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर तो जास्त शांत, विश्वस्त आणि जबाबदार बनला आहे. त्याची वक्तव्येही खूप जबाबदार वाटतात. त्यामुळे कर्णधार बनल्यानंतर त्याच्यात झालेला बदल हा हार्दिकचे २.० व्हर्जन बनण्यामागचा एक पैलू असू शकतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

२. सुरुवातीपासून बॅटने धमाकेदार प्रदर्शन-
आयपीएल पंधराव्या हंगामातील पहिल्या सामन्यापासूनच गुजरातचा (Gujrat Titans) कर्णधार हार्दिकचा फलंदाजीत बोलबाला राहिला आहे. त्याने त्याच्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत त्याने सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅप पटकावली होती. हार्दिकने आतापर्यंत ५ सामन्यांमध्ये ७६ च्या सरासरीने फलंदाजी करताना २२८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या नाबाद ८७ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्यामुळे हादेखील हार्दिकच्या २.० व्हर्जनचा दुसरा पैलू म्हणता येऊ शकतो.

३. गोलंदाजीतही झालीय सुधारणा-
दुखापतीनंतर हार्दिक गोलंदाजीसाठी संघर्ष करताना दिसत होता. परंतु आता त्याचे गोलंदाजीतील प्रदर्शनही सुधारले आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत १८.३ षटके गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या आहेत.

४. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदासाठी ठोकलाय दावा-
हार्दिकने कर्णधार म्हणून उमदा कौशल्य दाखवत यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी आपला दावा अजून मजबूत केला आहे. त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहता संघ निवडकर्ते त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्याबाबत नक्की विचार करतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आर अश्विन का आला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला? संजू सॅमसनने केला खुलासा

IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल हैदराबाद वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत टेनिसनट्स संघाचा सलग दुसरा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---