India vs England Pitch Report: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाईल. गेल्या 18 वर्षांपासून भारतीय संघ इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर कोणतीही कसोटी मालिका हरवू शकलेला नाही. त्यामुळे ही आगामी मालिका अत्यंत खास असेल, कारण शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाची ही पहिली कसोटी मालिका असेल. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील निवृत्तीमुळे भारतीय संघाचा भाग नसतील. चला तर मग पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टीची कशी असेल, फलंदाजांना फायदा होईल की गोलंदाज कहर करतील. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (IND vs ENG First Test)
पहिला सामना हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. साधारणपणे येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असते, परंतु जसजसा चेंडू जुना होतो, तसतसे फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरू लागतात. लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आकाश ढगाळ राहू शकते. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना जबरदस्त स्विंग मिळू शकतो. असे झाल्यास फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात. (Headingley Pitch Report)
हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंडच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, येथे चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचे वर्चस्व राहिले आहे. (Fourth Innings Chase Headingley) या मैदानावर आतापर्यंत एकूण 81 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 29 वेळा, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 34 वेळा विजय मिळवला आहे. येथे चौथ्या डावात 404 धावांचे लक्ष्यही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवरचा तो ऐतिहासिक विजय 1948 साली झाला होता. येथे पहिल्या 2 डावांमध्ये फलंदाज अधिक प्रभावी असतात, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या डावात गोलंदाज प्रभावी ठरू लागतात. (Fast Bowlers Headingley)
हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय संघाच्या कसोटी रेकार्डवर नजर टाकल्यास, येथे त्यांनी आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. हे सर्व सामने इंग्लंडविरुद्ध झाले, ज्यात 2 वेळा विजय मिळाला आहे, तर 4 वेळा पराभव झाला आहे आणि 1 सामना अनिर्णित राहिला होता. हे इंग्लंडच्या होम ग्राऊंड्सपैकी एक आहे, जिथे त्यांनी आतापर्यंत 80 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 37 सामन्यात विजय मिळवला, तर 25 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान 18 सामने अनिर्णित राहिले. (Headingley Cricket Ground Records)