सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. युवा गोलंदाज मुकेश कुमार याने पहिल्या सामन्यात भारतीय संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन हे पाहून खूप प्रभावित झाले असून त्यानी मुकेश कुमारची तुलना भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी याच्याशी केली आहे. अश्विनच्या मते, भारताचा पुढील शमी हा मुकेश कुमार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मुकेश कुमारने चांगली गोलंदाजी केली. त्याला एकही विकेट मिळाली नाही पण त्याने चार षटकात केवळ 29 धावा दिल्या. मुकेश कुमारने शेवटच्या षटकात जबरदस्त यॉर्करही टाकले.
रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याच्या मते, मुकेश कुमार (Mukesh Kumar) ज्युनियर मोहम्मद शमी (Mohammad Shami) असू शकतो. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना तो म्हणाला, “आधी मला वाटत होतं की मोहम्मद सिराज ज्युनियर शमी बनेल पण आता मला वाटतं मुकेश कुमार ज्युनियर शमी बनू शकतो. शमीला लाला म्हणतात आणि अभिनेते मोहनलाल यांना श्रद्धांजली म्हणून हे नाव त्याला देण्यात आले आहे. मी शमीला लालेटन म्हणतो जे की मोहनलाल यांना देखील म्हणलं जायचं. मुकेशचीही शरीर रचना शमीसारखीच आहे. त्याच्या मनगटाची स्थितीही हुबेहुब शमीसारखी आहे. त्याची सीमही अगदी साधी आहे.”
विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात मुकेश कुमारने ज्या प्रकारे यॉर्कर टाकला होता त्यावर माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यानेही मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्याने मुकेश कुमारचे खूप कौतुक केले आणि सांगितले की तो गोलंदाजी मशीन लावल्याप्रमाणे यॉर्कर टाकत होता. संपूर्ण सामन्यात मुकेश कुमार सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे त्याने म्हटले होते. त्याने संघासाठी कठीण षटके टाकली आणि तरीही त्याने जास्त धावा दिल्या नाहीत. (This is India’s next Mohammad Shami Ashwin’s big statement about this bowler of Team India)
महत्वाच्या बातम्या
कॅरेबियन फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा! बोर्डावर गंभीर आरोप करत 34 व्या वर्षी घेतला निर्णय
माजी पाकिस्तानी गोलंदाजाची रोहित शर्माबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो जगातील सर्वात…