मंगळवार, ३ जुलैला भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने या विजयासह आपल्या महत्वपूर्ण इंग्लंड दौऱ्याची विजयी सुरवात केली.
भारताने प्रथमच इंग्लंमध्ये इंग्लंडवर टी२०मध्ये विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय गोलंदाज कुलदीप यादव आणि फलंदाज केएल राहुल जाते.
१८ महिन्यांनी केले आंतरराष्ट्रीय शतक-
केएल राहुलने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक डिसेंबर २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध केले होते. १९९ धावा करताना त्याने हे शतक चेन्नईला केले होते.
त्यानंतर त्याने तब्बल १८ महिन्यांनी शतकी खेळी केली. मधल्या काळात त्याला एकही शतकी खेळी क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात करता आली नाही.
या १८ महिन्यात त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ३० सामन्यात ३५ डावात ११६० धावा केल्या. त्यात त्याची सरासरी ३४.११ राहिली. या ३५ डावात त्याने १४ अर्धशतके केली होती.
या काळात सरासरीही खालावली-
या काळात भारताकडून १००० धावा केलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या (२८.९२) नंतर त्याची सरासरी सर्वात खराब राहिली.
या काळात ज्या खेळाडूंनी ४३० पेक्षा जास्त धावा केल्या त्यात मनिष पांडे आणि केएल राहुल या दोघांनाच शतकी खेळी करता आली नाही. मात्र पांडेची सरासरी मात्र केएल राहुलपेक्षा चांगली राहिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात
-जगाला मिळणार दुसरा शेन वार्न, वय आहे फक्त ७ वर्षे
-कुलदीप यादवला कमी लेखणे महागात पडले, या खेळाडूने मान्य केली चूक