---Advertisement---

चाळीशी पार केल्यावर करियरमध्ये पहिले वाहिले शतक झळकवणारा एकमेव फलंदाज, तर कुंबळेच्या नावावर

On: शुक्रवार, जून 26, 2020 6:02 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अगदी गोलंदाजालाही या प्रकारात शतकी खेळी करावी असे वाटते. काही खेळाडू अगदी लहान वयात पदार्पण करतात व लगेच पहिली शतकी खेळी करतात.

काही खेळाडूंना पहिल्या शतकी खेळीसाठी अनेक वर्ष वाट पहावी लागते. काही खेळाडू असेही असतात, जे इतर खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयात आपले पहिले शतक करतात.

असे असले तरी क्रिकेट इतिहासात एकच असा खेळाडू होता ज्याने वयाच्या चाळीशीनंतर कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या आर्थर विल्यम्स नॉर्सने १२ नोव्हेंबर १९२१ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी २९१ दिवसांनी शतक केले होते. त्याने १९०२ साली पदार्पण केल्यानंतर तब्बल १९ वर्षांनी हे शतक केले होते. १९२४साली निवृत्त झाला तोपर्यंत त्याला दुसरे शतक करता आले नाही.

या यादीत दुसरा फलंदाज इंग्लंडचा इच बॉउले (Ich Boule) होता. त्याने १४ फेब्रुवारी १९३० रोजी वयाच्या ३९ वर्ष व २५३ दिवसांचे असताना न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिले शतक करताना १०९ धावा केल्या. हे त्यांच्या कारकिर्दीतील एकमेव शतक ठरले.

यादीत अनिल कुंबळे (Anil Kumble) हा पहिला असा भारतीय खेळाडू आहे, ज्याने वयाची ३६ पार केल्यावर कारकिर्दीतील पहिले शतक केले. ९ ऑगस्ट २००७ रोजी लॉर्ड्स येथे कुंबळेने इंग्लंडविरुद्ध नाबाद ११० धावांची शतकी खेळी केली होती. तेव्हा कुंबळे ३६ वर्ष २९६ दिवसांचे होते. या दिवसापुर्वी किंवा नंतर कुंबळेने कधीही शतक केले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---