---Advertisement---

डोंबिवली- बोरीवलीकडे टीम इंडियाची धुरा, मुंबईकर रहाणे कर्णधार तर रोहित उपकर्णधार

On: शुक्रवार, जानेवारी 1, 2021 3:49 PM
---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील रोमांचक लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागले आहेत. ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याला कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे एक अनोखा योगायोग जुळून आला आहे.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला. त्यामुळे उर्वरित तीन कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. तर दुसरीकडे कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु रोहितच्या पुनरागमनामुळे येत्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पुजारा नव्हे तर रोहित संघाचा उपकर्णधार असणार आहे.

अशाप्रकारे भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मुंबईकर संघातील दोन महत्त्वाची पदे सांभाळताना दिसणार आहेत. रहाणे आणि रोहित यांचा जन्म महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात झाला आहे. पण हे दोन्ही क्रिकेटपटू सध्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे राहतात. मुंबईच्या डोबिंवली भागात रहाणेचे घर आहे, तर रोहित मुंबईच्या बोरिवली भागात राहतो.

नुकताच जोडला गेला भारतीय संघासोबत

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकला होता. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही तो उपलब्ध नव्हता. आयपीएलदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केला.

पुढे ११ डिसेंबरला फिटनेस टेस्ट मध्ये पास झाल्यांनतर तो १४ तारखेला ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता. सिडनीत १४ दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो ३० डिसेंबरला भारतीय संघात सामील झाला. त्याने सरावाला सुरुवात केल्याचे छायाचित्रही बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड

ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी ‘टी नटराजन’ला संधी

“तो पूर्ण तयारीसह आलाय”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केलं अश्विनचं कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---