---Advertisement---

कोहलीच्या टीम इंडियाने पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा

On: रविवार, जानेवारी 26, 2020 6:22 PM
---Advertisement---

ऑकलँड। आज(26 जानेवारी) भारताने इडन पार्क येथे न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने शुक्रवारी(24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध या टी20 मालिकेतील इडन पार्क येथेच झालेला पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला होता.

त्यामुळे असे पहिल्यांदाच झाले की भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये न्यूझीलंडला सलग दोन सामन्यात पराभूत केले आहे. याआधी भारताला न्यूझीलंडविरुद्ध सलग 2 आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विजय मिळवता आला नव्हता.

भारताने आत्तापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध 13 टी20 सामने खेळले आहेत. यातील 5 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 8 सामन्यात पराभव स्विकारला आहे. विशेष म्हणजे भारताने विजय मिळवलेल्या 5 सामन्यांतील 3 सामने ऑकलँडलाच खेळले आहेत. तर एक सामना दिल्ली आणि एक सामना तिरुअनंतपूरम येथे जिंकला आहे.

आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 132 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 133 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने केएल राहुलच्या(57*) अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17.3 षटकात 135 धावा करत सहज पार केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---