कोरोना व्हायरसने (Corona Virus) संपूर्ण जगात थैमान मांडला आहे. भारतातही त्याचा प्रादुर्भाव होत आहे. २५ मार्च ते १४ एप्रिल २०२० दरम्यान संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन होता. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात प्रादुर्भाव झाला. पण तरी आपल्या आणखी काही दिवस लॉकडाउनसाठी सहकार्य करावे लागणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशात लॉकडाउन (Lockdown) ३ मे पर्यत वाढवण्याची आजच घोषणा केली आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या महिला कबड्डी संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज दिला आहे. “मी कबड्डीपटू घरीच थांबणार, माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी, प्रशासनाला सहकार्य करणार, कोरोनाला ऑल-आऊट करणार” असा संदेश त्यांनी आपल्या फोटो सोबत दिला आहे. सर्वांनी घरीच थांबून कोरोनाला संपवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
https://www.instagram.com/p/B-98Em9pnbY/?igshid=jyjblr4u4sy5
ठाणे महानगरपालिके कडून २०१८ साली व्यावसायिक महिला कबड्डी सुरू करण्यात आला आहे. तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल, विद्यमान आयुक्त श्री. विजय सिंघल, विद्यमान महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांने व उपआयुक्त संदीप माळवी तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मीनल पालांडे यांनी ह्या संघाची सुरुवात केली. मीनल पालांडे ह्या ठाणे मनपा मध्ये क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहतात. सदर संघात महाराष्ट्रातील नावाजलेल्या महिला कबड्डीपटू आहेत. सर्वच खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अनुभव आहे. तर सध्या संघाच्या प्रशिक्षकपदी हरेश्वर कोळी व व्यवस्थापकपदी नीना गोळे ह्या काम पाहत आहेत. तर फिटनेस ट्रेनर म्हणून भटू निकम हे काम पाहतात.
https://www.instagram.com/p/B-97Tayp0ut/?igshid=13jrj6sns3pyk
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटपटूंनो, ही असली काम करण्यापेक्षा किराणा मालाची दुकानं सुरु करा
-२५ वर्षांपेक्षा जास्त काळ कसोटी खेळणारे ५ दिग्गज खेळाडू
-टी२० विश्वचषक झाला नाही तर जगातील ५ क्रिकेटपटूंचं करियर जवळपास संपल्यात जमा