इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेला पुनर्निधारीत पाचवा कसोटी सामना रोमांचक चालू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. रिषभ पंतने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात हातभार लावला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (०२ जुलै) अष्टपैलू रविंद्र जडेजा याने त्याचे शतक पूर्ण केले आहे. या शतकी खेळीसह त्याने विक्रमांची रास घातली आहे.
जडेजाने (Ravindra Jadeja) सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १८३ चेंडूत शतकाला गवसणी (Ravindra Jadeja Century) घातली आहे. ही खेळी पूर्ण करण्यासाठी त्याने १३ चौकार मारले. हे जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. तत्पूर्वी यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) यानेही शतक ठोकले आहे. १११ चेंडू खेळताना ४ षटकार आणि २० चौकारांच्या मदतीने १४६ धावांची प्रशंसनीय खेळी त्याने केली होती. अशाप्रकारे जडेजा आणि पंत या दोन्ही डाव्या हाताच्या फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध एकाच सामन्यात शतके केली आहेत.
यासह २ डाव्या हाताच्या फलंदाजांनी एकाच डावात भारतासाठी शतक करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २००७ मध्ये सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांनी हा पराक्रम केला होता. बेंगलोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील एका डावात डावखुऱ्या गांगुली आणि युवराज यांनी शतकी खेळी केल्या होत्या. या सामन्यात गांगुली २३९ धावा आणि युवराज १६९ धावा केल्या होत्या. तसेच १९९९ मध्ये सदगोप्पन रमेश (११० धावा) आणि सौरव गांगुली (१२५ धावा) यांनी न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.
Third Test ton for Ravindra Jadeja 🔥#WTC23 | #ENGvIND | https://t.co/wMZK8kesdD pic.twitter.com/MxCN2n9Drp
— ICC (@ICC) July 2, 2022
ऍजबस्टनवर शतक करणारा चौथा भारतीय
दरम्यान जडेजा शतकानंतर १९४ चेंडूंवर १३ चौकारांच्या मदतीने १०४ धावा करून बाद झाला. यासह तो ऍजबस्टनच्या मैदानावर शतक करणारा चौथा भारतीय फलंदाजही बनला आहे. सचिन तेंडूलकर, विराट कोहली, रिषभ पंत यांनीही या मैदानावर शतक करण्याची कामगिरी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सर जडेजा अभी जिंदा है! सीएसके मॅनेजमेंटला इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून दिलं उत्तर
व्वा रे पठ्ठ्या! पंतने विरोधी प्रशिक्षकालाही कौतुक करायला पाडले भाग; म्हणाले, ‘सलाम ठोकू इच्छितोय’
ENGvsIND: पंत-जडेजा जोडीची कमाल सचिन-अझरूद्दीनच्या ‘त्या’ २५वर्षे जुन्या विक्रमाशी केली बरोबरी