---Advertisement---

119 कसोटी, 8214 धावा! ‘या’ दिग्गजाने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती.!

On: रविवार, जून 22, 2025 1:48 PM
---Advertisement---

श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू एंजेलो मैथ्थूज (Angelo Mathews Retirerd form Test cricket) सध्या चर्चेमध्ये आहे. 21 जून 2025 रोजी त्याने त्याच्या कसोटी करिअरचा शेवटचा सामना खेळला. आता हा खेळाडू पांढऱ्या जर्सीमध्ये पुन्हा कधीच खेळताना दिसणार नाही. बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये (Ban vs SRI) गोल येथे झालेला शेवटचा कसोटी सामना ड्रॉवर संपला. हा मैथ्यूजच्या करिअरचा शेवटचा सामना होता. सामन्याआधीच त्याने निवृत्तीची घोषणा केली होती, शेवटचा सामना खेळल्यानंतर त्याने भावूक वक्तव्य केलेलं आहे.

एंजेलो मैथ्थूजने (Angelo Mathews) बांगलादेश विरुद्ध ड्रॉ राहिलेल्या सामन्यानंतर त्याने म्हटले, जेव्हा मी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा मला विश्वास होत नव्हता की मला किती प्रेम मिळत आहे. मी त्या सर्वांचा आभारी आहे, ज्यांनी मला पाठिंबा दिला. क्रिकेटची कारकीर्द सोपी नव्हती. यामध्ये खूप उतार चढाव राहिलेले आहेत, याशिवाय देखील मी हे सर्व करण्यामध्ये यशस्वी होऊ शकलो. कसोटी क्रिकेट खेळणं मला आवडतं, या फॉरमॅट मधून निवृत्ती घेणं खूप भावूक करणारं आहे.

एंजेलो मैथ्थूजने श्रीलंका क्रिकेटला युवा खेळाडूंच्या हवाली केलं आहे. तो म्हणाला, आता वेळ आली आहे की युवा खेळाडू पुढे येऊन श्रीलंका संघाला विजय मिळवून देतील. आता आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. पथुम निसांकाने वास्तवात चांगली फलंदाजी केली. इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकणे आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरेलू मैदानात 3- 0 ने पराभूत करणे हे संघासाठी मोठी उपलब्धी होती. प्रशिक्षक आणि माझ्यासोबत राहिलेल्या सर्व चाहत्यांनी जे मला प्रेम दिले आहे, त्यासाठी धन्यवाद.

एंजेलो मैथ्थूज श्रीलंकाच्या त्या दिग्गज खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्यांनी कसोटी करिअरमध्ये 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. त्याने श्रीलंकासाठी 2009 मध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 119 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 8214 धावा केल्या, ज्यामध्ये 16 शतक आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 33 विकेट्स सुद्धा आहेत. त्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये देशाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने 13 सामन्यात विजय पत्करला आहे आणि 15 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तसेच 6 कसोटी सामने ड्रॉ राहिलेले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---