---Advertisement---

सॉरी सरफराज! युवा फलंदाजाला महागात पडलणार जडेजाची ही चूक? अष्टपैलूने मागितली थेट माफी

Ravindra Jadeja feeling bad for Sarfaraz Khan
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा आणि सरफराज खान हे दोघे चर्चेचा विषय बनले. रोहित शर्मा पाठोपाठ या दोघांनी संघासाठी पहिल्या डावात महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. पण सरफराज आपल्या अर्धशतकाला शतकात परिवर्तीत करू शकला नाही. अनेकजण सरफराजच्या विकेटसाठी रविंद्र जडेजा याला जबाबदार धरत आहेत. अशातच पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रविंद्र जडेजा याने स्वतः याविषयी प्रतिक्रिया दिली.

भारतीय संघाने राजकोट कसोटीत (Rajkot Test) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 5 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावा इतकी आहे. रोहित शर्मा (131) आणि रविंद्र जडेजा (110*) यांनी भारतासाठी पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. तर सरफराज खान (Sarfaraz Khan) याने 66 चेंडू खेलून 62 धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावातील 82व्या षटकात सरफराज खान नॉन स्ट्राईक एंडवर धाबाद झाला.

जेंम्स अँडरसन या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर रविंद्र जडेजाने सरफराजला सिंगलसाठी धावायला लावले. पण सरफराजने स्ट्राईक सोडल्यानंतर जडेजाने आपला निर्णय बदलला. परिणामी मार्क वुड याने मारलेल्या डायरेक्ट हीटवर सरफराज धावबाद झाला. याच कारणास्तव सरफराजच्या विकेटसाठी रविंद्र जडेजा याला जबाबदार धरले जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सरफराजाने जडेजाचेच कौतुक केले. अशातच जडेजा यानेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सरफराजची एकप्रकारे माफी मागितली. जडेजाने इंस्टाग्राम स्टेरिला लिहिले की, “वाईट वाटत आहे. सरफराज मी चुकीचा कॉल दिला होता. पण तू चांगला खेळला.” जडेजाच्या इंस्टा स्टोरिचे स्क्रीनशॉट्स सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

(This mistake of Jadeja will cost the young batsman? The all-rounder demanded a direct apology)

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

महत्वाच्या बातम्या – 
‘मी आणि माझ्या भावासाठी वडिलांनी…’, पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक ठोकल्यानंतर काय म्हणाला सरफराज
IND vs ENG । सरफराजला धावबाद केल्यामुळे जडेजावर संतापला रोहित? लाईव्ह सामन्यातील दोघांमध्ये राडा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---